विद्युत वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांसह एकाला लाचलुचपत विभागाचा एकविसशे रुपयांचा शॉक

विद्युत वितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांसह एकाला लाचलुचपत विभागाचा एकविसशे रुपयांचा शॉक

बिड (प्रतिनिधी) २ हजार १०० रुपयांची लाच मागणाऱ्या विद्युत वितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांसह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे. कनिष्ठ अभियंता किरण जयवंत निंबाळकर (२९) MSEB कार्यालय, उपविभाग परळी वर्ग (2) व खाजगी इसम शाहनिक दत्तात्रय अनुसे (३५) रा.रेवली ता.परळी जि.बीड असे लाच केलेल्यांची नाव आहे. बिड एसीबीच्या पथकाने ही कारवाई बुधवारी २४ मे रोजी केली. या कारवाईमुळे विद्युत वितरण कंपनीमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत ३३ वर्षाच्या व्यक्तीने बिड एसीबीकडे तक्रार केली आहे. कनिष्ठ अभियंता किरण जयवंत निंबाळकर व शाहनिक दत्तात्रय अनुसे यांनी फाईलवर सही करण्यासाठी पैसे मागितले होते तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बिडचे ला.प्र.विचे पोलिस निरीक्षक रविंद्र परदेशी अमलदार श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, गणेश म्हेत्रे यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की तक्रारदार यांचे वडिलांचे व साक्षीदारांचे भाऊ यांचे नावे असलेल्या शेतामध्ये महात्मा गांधी रा्ष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत अल्प भुधारक शेतकरी सिंचन विहीरीचे फाईल मधील NOC प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी पंचासमक्ष खाजगी इसमाचे मार्फतीने लाचेची मागणी करून लाच रक्कम खाजगी इसम याचे मार्फतीने स्वीकारण्याचे मान्य केले व खाजगी इसम यांने ३ हजार रूपयांची मागणी करून तडजोडी अंती फाईलवर सही घेऊन देण्यासाठी स्वतःसाठी २०० रु व लोकसेवकासाठी ५०० रूपये असे तीन फाईलचे प्रत्येकी ७०० रूपये प्रमाणे २ हजार १०० रूपये स्विकारण्याचे मान्य केले. म्हणुन वरील दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई.ला.प्र.वि. औरंगाबादचे पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधिक्षक बिडचे शंकर शिंदे

==================================
बीड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा. अँन्टी करप्शन ब्युरो, बीड

@ टोल फ्रि क्रं. 1064

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!