२०२२ चे अतिवृष्टीचे अनुदान राहीलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे नसता आत्मदहन करणार

गंगापूर (प्रतिनिधी) येत्या ३१ मे पर्यंत अनुदान वाटप न झाल्यास ११ जुन रोजी तालुक्यातील शेतकरयांसह पवार हे तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अनुदान वाटप करण्यास काय अडचण आहे आम्हा शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी खुप काही अशा अटी आणल्या ज्या वेळेस अनुदान वाटप करण्याची वेळ आली त्यावेळेस असे सांगितले की, आधारकार्ड, पासबुक मागण्यात आले याद्या तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी ते कागदपत्रे दिली आणि तरीही काही शेतकऱ्यांना अनुदान वाटप केले व काहींना आजपर्यंत अनुदान मिळालेले नाही.फक्त यात शेतकऱ्यांचा वेळ घालवण्याचे काम चालु आहे यातून स्पष्ट दिसून येत आहे की शेतकऱ्यांना तुम्हाला अनुदान द्यायचे की नाही. सध्या पेरणीचे दिवस आले आहे आणि शेतकऱ्यांना आजही पेरणीसाठी पैसा लागणार आहे म्हणून शेतकऱ्यांना अनुदानाची अपेक्षा असुन येत्या ३१ मे २०२३ पर्यंत अनुदान वाटप न झाल्यास ११ जुन रोजी शेतकरी नेते अर्जुन किसन पवार व तालुक्यातील शेतकरी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!