तिन महिन्याचा दारूच्या हप्त्याचे पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले

जालना (प्रतिनिधी)दारु हप्त्याचे व बायकोवर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजार रुपये लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षकाला औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.
सूर्यकांत केंद्रे, वय ५४ असे लाच घेताना पकडलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. औरंगाबाद एसीबीच्या पथकाने ही कारवाई गुरूवारी २५ मे रोजी केली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत ३३ वर्षाच्या व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली आहे. सूर्यकांत केंद्रे हे मंठा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. यातील तक्रारदार यांचे पत्नी कडून दाखल गुन्हा केंद्रे यांच्या कडे तपास करीता होता. त्या गुन्हातील दोषारोपपत्र दाखल करावे याबाबत तक्रारदार यांनी भेट घेतली असता केद्रे यांनी बीट हद्दीत तक्रारदार व त्यांचा भाऊ यांना देशी दारूची विक्री करता अशी विचारणा करून दर महिन्याला एक केस व मासिक हप्ता म्हणून २ हजार रुपये प्रमाणे मागील तीन महिन्याचे मिळून ६ हजार रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष करून तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले व लाच घेताना लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, पोअं नागरगोजे, काळे, जोशी, देसाई, ठाकूर, बागुल यांनी रंगेहाथ पकडले ही कारवाई ला.प्र.वि.औरंगाबादचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उप अधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास टोल फ्री क्र:- १०६४ किंवा पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद 9923023361 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!