दुस-या घटनेत १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिडको ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडले

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी करण्यासाठी १२ हजार रुपये लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकाला औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.
नितिन दशरथ मोरे असे लाच घेताना पकडलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. औरंगाबाद एसीबीच्या पथकाने ही कारवाई गुरूवारी २५ मे रोजी केली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत ४७ वर्षाच्या व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली आहे. मच्छिन्द्र बापूराव ससाणे हे सिडको पोलीस स्टेशन, औरंगाबाद शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
तक्रारदार व त्यांचे मित्र यांचे विरुद्ध दाखल तक्रारी अर्जात तक्रारदार यांचेवर गुन्हा दाखल न करण्यासाठी व सदर तक्रारी अर्जात गुन्हा दाखल झाल्यास तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी मोरे यांनी तक्रारदार यांना २० हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती १२ हजार रुपयाची मागणी करत पंचा समक्ष लाचेची रक्कम स्वीकारली असता लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक हनुमंत वारे,पोना साईनाथ तोडकर, पो.ना. विलास चव्हाण, पो.ना. राजेंद्र शिनकर यांनी रंगेहाथ पकडले ही कारवाई ला.प्र.वि.औरंगाबादचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे,अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे,पोलिस उप अधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास टोल फ्री क्र:- १०६४ किंवा
पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद 9923023361 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!