गंगापूर तालुका शिक्षक पतसंस्था निवडणूक-शिक्षक विकास पॅनेलच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल

गंगापूर (प्रतिनिधी) शिक्षकसेना व शिक्षकभारती संयुक्तपणे गंगापूर शिक्षक पतसंस्थेची निवडणूक लढवणार

गंगापूर तालुका शिक्षक पतसंस्थेची निवडणूक ६ जून रोजी होत असून शिक्षकसेना व शिक्षकभारती संघटना एकत्रितपणे शिक्षक विकास पॅनेलच्या नावाने ही निवडणूक लढवत आहे.दिनांक २ मे व दिनांक ४ मे रोजी शिक्षक विकास पॅनेलच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.यामध्ये प्रभाकर पवार, अनिल काळे, भगवान हिवाळे, विजयकुमार ढोले, उद्धव बोचरे, गोपीनाथ प्रधान, विलास वाघ, राजेंद्र बोल्डे, प्रदीप पगारे, विकास भराडे, जावेद पटेल, विकास बोचरे, आरुण आल्हाट, विजय चव्हाण, सिताराम शेजुळ, गणेश इखे, सुनिल वाघचौरे, रमेश दळे, ज्योती सोनवणे, गायत्री परदेशी, पुष्पा वाकळे, सुनिता अकोलकर, कल्पना पानसरे यांचे उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करत दाखल करण्यात आले.

याप्रसंगी शिक्षकभारतीचे नेते प्रकाश दाणे, संतोष ताठे, महेंद्र बारवाल,विजय ढाकरे, प्रविण संसारे, मच्छिंद्र भराडे तसेच सतीश लांडगे, संदीप माघाडे, प्रकाश वाघ, नारायण ढवळे, कैलास गायके, सुनिल तळेकर, सुभाष पल्हाळ, योगेश दांगुर्डे, लक्ष्मण जाधव, अजिनाथ खिल्लारे,विजय वाघचौरे, सिताराम गायकवाड, साईनाथ जानराव, मच्छिंद्र रावते, भानुदास घिटरे, सचिन पाठक, सुनिल थोरात, प्रमोद भोरे, चंद्रकांत शेरखाने, विजय तुपे, नितीन जाधव, उमेश पगारे, कैलास सुर्यवंशी, वाल्मिक कुरणे, लक्ष्मण कळसकर, चंद्रकांत निकम, बाबासाहेब सोनवणे, येडू शेलार, रेखा जारवाल, कल्पना मगरे, प्रमिला बनसोडे, शितल अवसरमल, कल्पना तत्तापुरे, वैशाली नंदन यांचेसह असंख्य सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!