श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिरामध्ये कुमारपाल महाराजांच्या हस्ते महाआरती करण्यात आली..शोभा यात्रा व शाही मंडप व्यवस्थेमुळे सिडको बनले राजमहल

श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिरामध्ये कुमारपाल महाराजांच्या हस्ते महाआरती करण्यात आली..
शोभा यात्रा व शाही मंडप व्यवस्थेमुळे सिडको बनले राजमहल

छञपती संभाजीनगर (प्रतिनिधी) श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिरामध्ये कुमारपाल महाराजांच्या हस्ते १०८ दिव्यांनी महाआरती करण्यात आली . गुरु गौतम श्री श्वेतांबर वर्धमान जैन सेवा संघ एन ३ सिडको यांच्या वतीने श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन जिनालयात १२ सप्टेंबर पासुन पर्युषण महापर्वास प्रारंभ झाला असुन गेल्या ६ दिवासापासुन अनेक धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले पर्युषण महापर्वा निमित्त वर्षातून एकच वेळेस कुमारपाल महाराजांच्या हस्ते होणाऱ्या महाआरतीचे आयोजन १८ सप्टेंबर रोजी श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन जिनालयात सिडको एन ३ येथे करण्यात आले या महाआरतीचा लाभ प्रभादेवी ललीत चोरडीया, अजित अभिजीत चोरडीया परिवारांतर्फ घेण्यात आला रात्री ८ वाजता सुरेश जैन यांच्या निवास्थानाहुन परिवारातील सर्व सदस्यांची राजेशाही पोशाखात सुंदररित्या सजविलेल्या बग्गीतुन शोभायात्रेला सुरवात झाली या शोभायात्रेत कुमारपाल महाराज अजित चोरडीया, महाराणी प्रिया चोरडीया, अभिजीत चोरडीया, स्वीटी चोरडीया, कुशल, चारव्ही, चैतन्य, किर्ती चोरडीया, ओमप्रकाश सिसोदिया, शांताबाई सिसोदिया आदि परिवार राजेशाही पोशाखात उपस्थित होते संपुर्ण चोरडीया परिवातील सदंस्याना फेटे प्रदाण केले होते शोभायात्रे समोर बॅण्ड पथक, ढोलपथक होते शोभायात्रा मंडपात पोहचताच संगीतकार मेहुल रुपडा, संजय संचेती व दर्शीत गादिया यांनी राजेशाही अंदाजात भक्तीगीत सादर करुन महाराजांचे भव्य स्वागत केले त्यानंतर मंडपात केलेल्या राजेशाही बैठकीत महाराजांच्या परिवारास बसविण्यात आले होते त्यानंतर तिन्ही संगीतकारांनी विविध भक्तीगीते प्रस्तुत केली भक्तीगीतांच्या कार्यक्रमानंतर कुमारपाल महाराज अजीत चोरडीया व उपस्थितीत परिवारांच्या हस्ते १००८ दिपकांच्या आरतीने श्री शंखेश्वर पार्श्वनाथ भगवतांची महाआरती संपन्न झाली याप्रसंगी उपस्थितीत सर्व भाविकांना आरतीसाठी दिपक देण्यात आले होते
श्रावक संघ सिडको अंतर्गत प. पु. ग. अभयदेवसुरीश्वरजी महाराजांच्या प्रेरणेने निर्माण होणाऱ्या अभयदेवसुरीश्वरजी आराधना भवन मध्ये लाभ घेतलेल्या परिवारांचा ट्रस्टच्या वतीने बहुमान करण्यात आला यावेळी सकल जैन समाजाचे कार्याध्यक्ष माजी आमदार सुभाष झांबड, मंत्री अतुल सावे, ट्रस्टी रतीलाल मुगदिया, सुरेश जैन, घेवरचंद बोथरा, प्रकाश झांबड, नगीनचंद संघवी, राजेश कांकरीया, संजय कांकरीया, दिपक संचेती, हेमचंद चंडालीया, तेजमल बंब, रवि मुगदिया, राजेश संचेती, अजीत जैन, जितु संघवी, अजय सिघंवी, सुरेशचंद बाफना, कैलाश बाफना, संजय भंसाली, विजय कटारीया, मिठालाल कांकरीया, मनसुख झांबड, पंकज फुलफगर, मनोज बोरा , वैजापूरचे राजु संचेती आदी उपस्थित होते
या भक्तीसंध्येत लकी ड्राॅ काढण्यात आला अनिता मनोज रुणवाल परिवारातर्फे बक्षीसे देण्यात आली लहान मुलांसाठी विशेष बक्षीसे अनिल मुथा, डाॅ संदिप मुथा, मुथा मोटर्स तर्फे देण्यात आले या सोहळयास संपुर्ण शहरातून चोरडीया परिवाराचे मित्र परिवार, सिडको राॅयल ग्रुपचे सदस्य व सकल जैन समाजाचे भाविक मोठया संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!