मित्रां सोबतचे जेवण अखेरचे ठरले; जीपच्या धडकेत दोन बालमित्रांचा जागीच मृत्यू

मित्रां सोबतचे जेवण अखेरचे ठरले; जीपच्या धडकेत दोन बालमित्रांचा जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : झाल्टा फाटा परिसरात जेवण करून दुचाकीवरून ट्रिपलसीट घराकडे निघालेल्या मित्रांना अज्ञात भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दोन ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे .
झाल्टा फाटा परिसरात जेवण करून दुचाकीवरून ट्रिपलसीट घराकडे निघालेल्या मित्रांना सुसाट कारने उडवले. यात अभिषेक राजू लोकल (२५, रा. कडा वसाहत, गारखेडा) आणि विजय जगन्नाथ काकडे (२५, रा. विष्णूनगर, जवाहर कॉलनी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा मित्र उमेश उमानंद कत्तीकर (२३, रा. कडा वसाहत, गारखेडा) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुंदरवाडीजवळ सोमवारी पहाटे ३ वाजता हा अपघात झाला.

जखमी उमेश एका फ्रेम बनवण्याच्या दुकानात काम करतो. तर त्याचे दोन मित्र अभिषेक आणि विजय हे खासगी कंपनीत कामगार होते. रविवारी अभिषेक आणि विजय दोघांनी दिवसभर कंपनीत काम केले. त्यानंतर उमेशला संपर्क करून सोबत जेवण्यासाठी जाण्याचे त्यांचे नियोजन ठरले. एकाच दुचाकीवरून ते झाल्टा परिसरात गेले. जेवण करून परतत असताना पहाटे ३ वाजेच्या सुमारास सुंदरवाडी परिसरात त्यांना सुसाट गाडीने धडक दिली. वेग खूप असल्याने धडकेत तिघेही दूरवर फेकले गेले. विजय व अभिषेक डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले. मात्र, मध्यरात्र असल्याने त्यांना वेळेवर मदतही मिळू शकली नाही. परिणामी, दोघांचा जागीच मृत्यू झाला. धडक देणारी गाडी बोलेरो असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, तिचा क्रमांक स्पष्ट होऊ शकला नाही. हेड कॉन्स्टेबल राजधर शेजुळ अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!