नरेंद्राचार्यजी महाराज भक्त परिवाराच्या वतीने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात ७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.


गंगापूर (प्रतिनिधी) सद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान दक्षिण पीठ नाणिजधाम तसेच जिल्हा सेवा समिती छत्रपती संभाजी नगर व स्व स्वरूप संप्रदाय तालुका सेवा समिती गंगापूर यांच्या वतीने रविवार १८ फेब्रुवारी रोजी गंगापूर येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

एक लाख बॅग रक्त संकलनाचा संकल्प हा महाराष्ट्रभर असून या संकल्पास सर्व स्तरावरुन नागरिकांनी हातभार लावून राष्ट्राची सेवा करावी असे आव्हान नाणीज पिठाचे उत्तर अधिकारी कानिफनाथ महाराज यांनी केले आहे.या आव्हानावर गंगापूर तालुक्यातून ७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून रक्त संकलनाच्या संकल्पास मोठ्या प्रमाणावर हातभार लावला आहे. या शिबिरास सकाळी दहा वाजेच्या सुमारास सुरुवात झाली या शिबिराची उद्घाटन होमगार्ड समादेशक अधिकारी चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.छत्रपती संभाजी नगर येथील संजीवनी रक्त संकलन केंद्र यांनी रक्त संकलन केले असून डॉक्टर विद्या घोडके,जनसंपर्क अधिकारी डॉक्टर मनोज चव्हाण,नागेश कुंजरवाड,आदींनी परिश्रम घेतले आहे.या वेळी जिल्हा सेवा समिती छत्रपती संभाजी नगर तसेच व स्वरूप संप्रदाय तालुका सेवा समिती गंगापूर येथील मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!