छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पत्रकार राजेंद्र सरोवर यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवरांचा होणार सन्मान

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त श्रीमंत कोकाटे, व लेखिका डॉ. प्रतिभा अहिरे यांचे व्याख्यान.

राजेंद्र सरोवर यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवरांचा होणार सन्मान.

गंगापूर/प्रतिनिधी
छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठानच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये गंगापूर तालुक्यातील राजेंद्र सरोवर यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील भानुदासराव चव्हाण सभागृह, रेल्वे स्टेशन रोड येथे रविवार . १४ रोजी होणाऱ्या सकाळी १०.३० वा. होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, न्या. साधनाताई जाधव, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आदींची उपस्थिती राहणार असून महासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय महारांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा जागर करणारे प्रसिध्द विचारवंत श्रीमंत कोकाटे, व लेखिका डॉ. प्रतिभा अहिरे यांचे व्याख्यान होणार असून सामाजिक, वैद्यकीय, प्रशासन, वृत्तपत्र, न्यायालयीन क्षेत्रात जिल्ह्यात काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरवचिन्ह, प्रमाणपत्र देउन सत्कार करण्यात येणार आहे.
यांचा होणार गौरव..
निर्मलाताई लक्ष्मीकांत पाटील, विधिज्ञ adv. अमरजितसिंह गिरासे, सूर्यकांताताई गंगाधर गाडे, लोकमतचे संपादक नंदकिशोर पाटील, शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण, मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे, राजेंद्र सरोवर, डॉ. सीताराम जाधव, संजनाताइं जाधव, प्रशांत त्रिभुवन, गणेश इंगळे, मिर्झा सलिम बेग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!