तलाठ्याला कार्यालयाचे वावडे. तलाठी खिल्लारे यांचा मुख्यालयाचा गाडा छत्रपती संभाजीनगर येथुन


गंगापूर (प्रतिनिधी) शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून मुख्यालयी न राहणा-या तलाठी खिल्लारे यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी.
गंगापूर तालुक्यातील
अगरकानडगांव, ममदापूर , नेवरगांव व हैबतपुर येथील सजाच्या तलाठी मंगलपोर्णीमा खिल्लारे या मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांना कामासाठी शोधत फिरावे लागत आहे यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे तलाठी मंगल पोर्णिमा खिल्लारे यांची चौकशी करून मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत

गंगापूर तालुक्यातील अगरकानडगांव, ममदापूर , नेवरगांव व हैबतपुर येथील सजाच्या तलाठी मंगल पोर्णिमा खिल्लारे यांची शासनाने नेमणूक केली असून मात्र शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सजाच्या ठीकाणी मुख्यालयी न राहता छत्रपती संभाजीनगर येथुन सजाचा गाडा हाकलल्या जात असल्याने शेतकऱ्यांना तलाठ्यास विविध कामांसाठी शोधत फीरावे लागत आहे.

तलाठी श्रीमती खिल्लारे यांना शासनाकडून मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना देखील शासनाची फसवणूक करुन घरभाडे भत्ता बिनबोभाट पणे ऊचलत असून वरिष्ठांच्या आशिर्वादाने हे सर्व गौडबंगाल सुरू असल्याचा शेतकरी खातेदारामधुन सुर निघत आहे.या सर्व गैरकारभाराची चौकशी करून आता पर्यंत शासनाची फसवणूक करुन उचलण्यात आलेल्या घर भाडे भत्ता वसुल करण्याची मागणी होत आहे.

तलाठी मंगलपोर्णिमा यांची शासनाने वरिल सजाच्या गावात नेमणूक केली असून या सजाच्या ठीकाणी राहत नसल्याने गोदावरी नदी पात्रातील वाळू पट्ट्यातुन मोठ्या प्रमाणात अवैध वाळू, वीटभट्टीसाठी पोयटा मुरुमाचे उत्खनन करून वाहतूक होत आहे मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता बिनबोभाट ऊचलत आहे.तसेच अवैध गौण उत्खनन करून वाहतूक होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असल्याने तलाठी श्रीमती मंगल पोर्णिमा खिल्लारे यांची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शेतकरी खातेदाराकडुन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया:
शासनाच्या आदेशानुसार तलाठी श्रीमती खिल्लारे यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना त्या मुख्यालयी राहत नसल्याने शेतकरी खातेदारांचे विविध कामे खोळंबली असून अवैध पोयटा उत्खनन करून वाहतूक होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.वरिष्ठांनी लक्ष देऊन तलाठी यांची चौकशी करून कारवाई करावी.
सुभाष कानडे.
ऊबाठा गंगापूर तालुका प्रमुख .

प्रतिक्रिया:
गंगापूर तालुक्यातील अगरकानडगांव, ममदापूर , नेवरगांव येथील सजाच्या तलाठी म्हणून श्रीमती खिल्लारे या आहे मात्र त्या मुख्यालयी राहत नाही शासनाची फसवणूक करुन घरभाडे भत्ता बिनबोभाट ऊचलत आहे.त्याच प्रमाणे वाळू पट्ट्यातुन मोठ्या प्रमाणात पोयटा व अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक होत आहे त्यांना जबाबदार धरून चौकशी करून कारवाई करावी.
कदीर शेख
शेतकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!