आठ महिन्यांपूर्वी चोरीला गेलेली कार वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पकडली आरोपी अटकेत

आठ महिन्यांपूर्वी चोरीला गेलेली कार वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पकडली आरोपीला अटक
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर रोडवरील ए. एस. क्लब चौकात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी आडवलेली बनावट नंबर प्लेटची स्विफ्ट कार निघाली चोरीची.आरोपी विरोधात एम आय डी सी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १३ जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वाळूज वाहतुक शाखा हद्दीत छ. संभाजीनगर ते अहमदनगर रोडवर ए. एस. क्लब चौकात वाळुज वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक शंकर शिरसाट पोना रंजक सोनवणे, पोना सुधीर मोरे, सतिश बड़े, पोशि अमोल जाधव वाहतुक नियमन व वाहतुकीची कारवाई करीत असतांना मारुती स्विफ्ट कार क्रं- एम एच २० डी जे ४२३९ हे वाहन ए.एस. क्लब चौकामध्ये आले असता वाहन तपासणी केली असता कारवर बनावट नंबर टाकुण चालवीतांना डिवाइस मशीन मध्ये दिसुन आले असता वाहनाच्या चेसीस नंबर व इंजीन नंबर यावरून खात्री केली असता कारचा मूळ क्रंमाक एम एच २० डी जे २०३३ असा निष्पण झाला कार चालक कृष्णा रामजी पाटील वय २१ वर्षे व्यवसाय खाजगी नौकरी राहणार दत्तनगर रांजणगाव वाळुज छ. संभाजीनगर त्याच्याकडे कारचे कोणतेही कागदपत्र नसल्याने तो कारवर बनावट नंबर टाकुण फसवणुक करण्याचा उद्देशाने बनावट करुन कार चालवितांना मिळून आला. ही कार ०४/१०/२०२२ रोजी एम.आय डी सी वाळुज येथुन चोरीला गेली असल्याची तक्रार एम आय डी सी वाळूज पोलीस ठाण्यात गुरं न क्रं – ८६१२/२०२२ भादवी कलम ३७९ गुन्हा दाखल आहे
ही कारवाई पोलीस आयुक्त छ. संभाजीनगर मनोज लोहीया , पोलीस उपआयुक्त वाहतुक अपर्णा गिते , सहाययक पोलीस आयुक्त वाहतुक विभाग संपत शिंदे , पोलीस निरीक्षक बाळूज वाहतुक शाखेचे दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक शंकर शिरसाट , पोना रंजक सोनवणे, सुधीर मोरे, सतिश हंबडे पोशि अमोल जाधव यांनी केली जप्त केलेले वाहन व आरोपी वाहन चालक यांना एम आय डी सी.वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या ताब्यात दिले असून ते पुढील तपास करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!