गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे जमा करून त्याची चौकशी करण्यात येणार आमदार प्रशांत बंब

गंगापूर (प्रतिनिधी)विरोधकांना शेतकरी, हमाल, मापाडी, व व्यापारी मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली असून त्यांना गंगापूर व लासूरच्या बाजार समिती निवडणुकीत चारी मुंड्या चित केले असल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडणुकीनंतर आमदार प्रशांत बंब यांनी पत्रकार परिषद घेतली परिषदेत बोलताना आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले की, पुढील काही दिवसांमध्ये गंगापूर व लासूर स्टेशन येथील बाजार समित्यांमध्ये धान्य चाळणी यंत्र कार्यान्वित करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय आगामी काळात झुणका-भाकर केंद्र, विश्रामगृह, धान्याच्या भावासाठी डिजिटल बोर्ड आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला आम्ही सभापती पदी निवड केली आहे येणाऱ्या काळात शेतकरी भवन, हमाल मापारी भवन तसेच खुला लिलाव करण्याचा मानस आहे येत्या तीन महिन्यात गंगापूर आणि लासुर बाजार समितीत चाळणी लावण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा दहा टक्के फायदा होणार आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूर व लासुर स्टेशन येथील बाजार समित्या प्रसिद्ध होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत मार्केट कमिटी म्हणजे शेतकऱ्यांचा महत्त्वाचा दुवा आहे बाजार समितीच्या कडून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा चांगला भाव देण्यात येईल तसेच खुलताबाद तालुक्यात दीड हजार गाई शेतकऱ्यांना देऊन दरडोई ५०० रुपये उत्पन्न कमावण्याचे साधन निर्माण केले आहे त्याचप्रमाणे गंगापूर तालुक्यातही वसुबारस पर्यंत दीड हजार गायी आणून साडेसातशे शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे असे यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी म्हटले आहे.

विरोधकांना शेतकरी, हमाल, मापाडी, व व्यापारी मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली असून त्यांना गंगापूर व लासूरच्या बाजार समिती निवडणुकीत चारी मुंड्या चित केले आहे कारण विरोधक प्रत्येक निवडणुकीत आपलेच नाते गोतें व स्वतःच निवडणुकीत उभे राहायचे व काम मात्र शून्य असायचे त्यामुळे मतदारांनी त्यांना जागा दाखवून दिली असून गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे जमा करून त्याची चौकशी करण्यात येइल असे सुतोवाच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बंब यांनी केले. यावेळी नंदकुमार गांधीले, लासूर स्टेशन बाजार समितीचे सभापती शेषराव जाधव, उपसभापती अनिल पाटिल चव्हाण, शेतकरी नेते संतोष पाटिल जाधव, दिपक बडे, रामेश्वर मुंदडा, प्रदीप पाटील, मारूती खैरे, अनिल राजगिरे, सुदाम भडके, भारत पाटील, उमेश बाराहाते, रवी चव्हाण, कृष्णकांत व्यवहारे, रज्जाक पठाण, जाफर शेख, आप्पासाहेब हिवाळे, नवनाथ सुराशे, रामेश्वर पाटील, सुरेश जाधव, सुनील पाखरे, अमोल जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!