गंगापूर नेवरगांव रोडवरअवैध वाळू वाहतूक करणारा टाटा टॅम्पो पोलीसांच्या विशेष पथकाने पकडला.


गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील म्हसोबावाडी येथे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा टॅम्पो पकडून गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून १० लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेवरगाव ते गंगापूर रोडवर म्हसोबावाडी येथे टाटा कंपनीचा लाल रंगाचा ९१२ टेम्पो क्रमांक एम एच २० जी सी ३११५ हा टेम्पो विनापरवाना दोन ब्रास वाळू वाहतूक करताना कृष्णा ज्ञानेश्वर जाधव वय २२ वर्ष रा राजुरा ता गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा मिळून आल्याने टेम्पो व दोन ब्रास वाळू एकूण किंमत १० लाख ६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वरील आरोपीविरुद्ध कलम ३७९ भादवि २१(१)(२)(३) गौण खाण खनिज अधिनियम ३(१)/१८१ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, पोलीस हवालदार नवनाथ कोल्हे, रामेश्वर धापसे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!