गद्दारांच्या विरोधात धगधगती मशाल पेटवून दिल्लीत आग लावण्यासाठी पाठवा असे आवाहन सुषमाताई अंधारे यांनी गंगापूर येथे केले.


गंगापूर (प्रतिनिधी)येत्या १३ तारखेला मशाल पेटली पाहिजे व आग दिल्ली पर्यंत लागली पाहिजे. महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही . सुषमाताई अंधारे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंगापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार सभेला शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.यावेळी लोकसभा समन्वयक प्रदिप खोपडे,महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे, अविनाश पाटील, अंकुश सुंब,राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर निळ, वाल्मीक शिरसाठ, विश्वजीत चव्हाण, कॉग्रेसचे विजय मनाळ, लक्ष्मण भुसारे, सुर्यकांत गरड,
,भारत तुपलोंढे, जिल्हा परिषदेच्या माजी.अध्यक्षा देवयानी डोणगावकर दलीत आघाडीचे मारोती साळवे, तालुका प्रमुख दिनेश मुथा, सुभाष कानडे शहर प्रमुख भाग्येश गंगवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना सुषमाताई अंधारे म्हणाल्या की, अवघा महाराष्ट्र जाणतो की देवेंद्र फडणवीस यांनी हा महाराष्ट्र नासवला देवेंद्र फडणवीस यांनी या अवघ्या महाराष्ट्राला २५ वर्षे मागे नेलं त्यांच्या मुळे महाराष्ट्राचा राजकीय स्तर कमालीचा खाली आला राजकारणातला सुसंस्कृतपणा जर कोणी संपवला असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांनी संपवला आणि नुसता सुसंस्कृतपणा संपवला नाही तर अवघ्या भारताचा इतिहास सांगतो की जेवढे म्हणून लोक भाजपाने आज पर्यंत सोबत घेतले त्या प्रत्येकाला संपवायचं काम केलं.
मोदी यांनी २०१४ ला सांगितले होते की कापसाला किमान १२ ते १४ हजारापर्यंत चा भाव पाहिजे सोयाबीनचा भाव हा किमान सहा ते सात हजारापर्यंत गेला पाहिजे २०१४ ला ते असं सांगत होते त्या वेळी डीएपी खताची बॅग चारशे रुपये होती सोयाबीनचा भाव ३८०० ते ४१०० होता कापसाचा भाव हा साधारणता सहा हजार होता आता काय परिस्थिती आत्ता सोयाबीनचा भाव किती ४००० रुपये आणि कापसाचा भाव किती ६००० रुपये म्हणजे भाव तोच आहे कापसाचा सोयाबीनचा भाव गेल्या दहा वर्षात अजिबात वाढला नाही पण डीएपी खताची बॅग चारशे रुपये होती ती आता १७०० रुपयाला झाली म्हणजे उत्पादनावरचा खर्च वाढला शेतीचा खर्च वाढला पण उत्पादनाला जो योग्य भाव मिळायला हवा होता तो भाव मिळाला नाही म्हणून आपल्याला मोदी नको. या उलट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्यांच्या काळामध्ये कापसाचा भाव ११ ते १३०० च्या घरात गेला होता,तर शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी मिळाली होती.
सभेत बोलताना पुढे शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे म्हणाल्या की,भ्रष्टाचा-यासाठी भाजप कचरा कुंडी झाली आहे,त्या कचरा कुंडीत भ्रष्टाचाराने बरबटलेल्या नेत्यांना आयात करुन पक्ष फोडीचे राजकारण सध्या सुरू आहे. दारु विकणा-याला लोकसभेत पाठवणार काय असा सवाल उपस्थितांना विचारताच सर्वांनी हात वर करून नाही पाठवणार असा इशारा केला.जाहिरातीचे युग सध्या सुरू आहे, जाहिरात ही वाईट गोष्टी ची होते त्यामुळे मोदी सरकारने जाहिराती करून जनतेची फसवणूक करीत आहे.फडणवीसांनी जातीपातीचे राजकारण करत ओबीसी व मराठ्यांमध्ये भांडण लावण्याचे काम केल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.यावेळी डोणगावकर, लक्ष्मण सांगळे, कॉग्रेसचे विजय मनाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वजीत चव्हाण, वाल्मीक शिरसाठ यांचे भाषण झाले.सर्वानी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची निशाणी मशाल समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी छाया जंगले, रुख्मिणी राजपूत,नईम मन्सुरी,भारत तुपलोंढे,उपतालुकाप्रमुख पोपटराव गाडेकर, रविंद्र पोळ, विश्वंभर शिंदे,शहर प्रमुख भाग्येश गंगवाल, उपशहरप्रमुख कैलास साबणे, अरविंद नाहटा, सूर्यकांत गरड,नगरसेवक आबासाहेब शिरसाठ, प्रकाश दुबे, विठ्ठल कोळेकर,विजय पानकडे, किसान सेनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत वाकडे, विभाग प्रमुख गोकुळ तांगडे, महेश लिंगायत, पोपट नरोडे, गुलाब शाह,कडुबा हिवाळे, शंकर अमृते, साखर कारखान्याचे संचालक सुभाष राजे भोसले, प्रविण वालतुरे, देवचंद कहाटे,दादा जगताप, गोविंद वल्ले,श्रीलाल गायकवाड, दलीत आघाडीचे मारोती साळवे, गंगाधर गाढे गटाचे बाबुराव नरवडे, इंद्रजित डोणगावकर, दादा कापसे, शिवनाथ राशिनकर , बाबासाहेब महाराज राशिनकर , राजेंद्र निकम,करण खोमणे,जिवन राजपूत, महेश शिंदे, युवा सेनेचे अमोल चव्हाण, ऋषिकेश धाट, ज्ञानेश्वर यादव, विजय चव्हाण, शंकर चव्हाण, अशोक चव्हाण, अंबादास तागड, मोहन औटी, पोपट नरोडे, संभाजी चव्हाण, भाऊसाहेब नेमाने,किसन ठवाळ,गोपाल वैष्णव, विठ्ठल चव्हाण यांच्या सह महिला व पुरुष आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!