पिक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अडीच तास तहसीलदार व विमा प्रतिनिधी यांना घेराव पैसे न मिळाल्यास सार्वजनिक फाशी आंदोलनाचा इशारा दिला


गंगापुर (प्रतिनीधी) ११ तारखेपर्यंत पिकविम्याचे पैसे शेतकऱ्यांचा खात्यांवर आले नाही तर १३ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.दोन दिवसांत विम्याची रक्कम देणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदार यांचे कार्यालय सोडले

गंगापूर तालुक्यातील जामगाव भेंडाळा मंडळातील शेतकऱ्यांना पिक विमा पासून वंचीत ठेवल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत ८ में रोजी १२ वाजता गंगापुर तहसिलदार यांच्या कॅबिनचा ताबा घेतला यावेळी तहसील कार्यालयात एकच गोंधळ उडाला.
यापूर्वी या भागातील शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता.परंतु प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाचा ताबा घेत पिक विमा कर्मचारी हेमंत शिंदे व अपर तहसीलदार आकाश दहादडे ,नायब तहसीलदार गौरव खैरनार व कार्यातील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले या आंदोलनात भाऊसाहेब गवळी कायगावकर, ज्ञानेश्वर गायकवाड, संजय गायकवाड, रामदास माने, सदानंद गायकवाड, बापूसाहेब गायकवाड, संतोष गायकवाड, बाळासाहेब भोगे, इसाक पटेल, गणेश चव्हाण, गोकुळ बोरुडे, ओंकार बोरुडे,भागचंद नजन, अनिल घुंगाशे, नारायण वायसळ, दिनेश भोगे, सुनील निरपळ, कैलास निकम, श्यामभाऊ दाणे ,साईनाथ माने, दत्तात्रय माने, अण्णासाहेब वाडकर ,अनिल मोरे ,मच्छिंद्र तागड गणेश मोरे, दिगंबर क्षीरसागर, ऋषिकेश चव्हाण, अविनाश चव्हाण, नवाज पटेल,मासुम पठाण,यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती.पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

प्रतिक्रिया:-जामगांव व भेंडाळा मंडळातील शेतकऱ्यांचा खात्यांवर १२ मे पर्यंत पिकविम्याचे पैसे आले नाहीतर अगोदर मतदानावर बहिष्कार टाकणार व आम्ही सर्व शेतकरी तहसीलदार यांच्या कॅबिनमध्ये सार्वजनिक फाशी घेवू.
शेतकरी -बंडु ठाकुर जामगाव

प्रतिक्रिया:-
आज संध्याकाळी याद्या अपलोड होतील पोर्टलवर याद्या अपलोड झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात दोन ते तीन दिवसांत पैसे जमा होतील.
आकाश दहादडे : अप्पर तहसीलदार

गंगापूर तालुका जामगाव आणि भेंडाळा महसूल मंडळाच्या आजच्या शेतकऱ्यांच्या आरोपानुसार आम्ही चोला एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी आयटीडी NCIP वर स्थानिक आपत्ती पात्र शेतकऱ्यांची यादी आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अपलोड करतो. तसेच दाव्याच्या पेमेंटची प्रक्रिया प्राधान्याने करून देण्यात येईल.
चोला क्लस्टर मॅनेजर हेमंत शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!