शेतकऱ्यांत बिबट्याची दहशत; शेताकडे फिरविली पाठ!शेतकऱ्यांनी बिबट्याला ताव मारताना मोबाईलमध्ये केले कैद…

शेतकऱ्यांत बिबट्याची दहशत; शेताकडे फिरविली पाठ!
शेतकऱ्यांनी बिबट्याला ताव मारताना मोबाईलमध्ये केले कैद…
गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील अगरवाडगाव धनगर पट्टी शिवारात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे शिकार केलेल्या बक-यावर ताव मारताना शेतकऱ्यांनी काढला व्हिडिओ. बिबट्याच्या भीतीने दैनंदिन कामांसाठी मजूर येण्यास तयार नाहीत, तर जिवाच्या भीतीने दहशतीखाली असलेले शेतकरी शेताकडे जात नसल्याचे चित्र आहे.
परिसरात पिंजरा लावण्याची मागणी
 गोदावरी पट्ट्यात बिबट्याच्या भीतीने दैनंदिन कामांसाठी मजूर येण्यास तयार नाहीत, तर जिवाच्या भीतीने दहशतीखाली असलेले शेतकरी शेताकडे जात नसल्याचे चित्र आहे.
दिलिप प्रकाश सुखधान गट नंबर २१४ यांच्या शेतातील शेड जवळ ९ जुन रोजी बिबट्याने बकरीची शिकार केली होती केलेली शिकार खाण्यासाठी १० जुन रोजी रात्री आठ वाजता बिबट्या शेडजवळ येवून त्याने बकरीवर ताव मारताना शेडमध्ये दबा धरुन बसलेल्या सात ते आठ शेतकऱ्यांनी बिबट्याला बघितल्यावर ते घाबरून गेले यात शेतकरी उध्दव सुखधान यांनी प्रसंगावधान राखून एका फटीतुन बिबट्याला ताव मारताना व मोबाईल कडे पहाताना दोन व्हिडिओ शूट केले.

प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन घडल्याने शेतांमध्ये बिबट्याच्या भीतीने मजूर कामाला येण्यासाठी धजावत नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. जिवाची भीती असल्याने खुद्द शेतमालकांनाही शेतात पाणी भरण्यासाठी, मशागतीसाठी जाता येत नसल्याने द्विधा मन:स्थिती झाली आहे.

दरम्यान, वनविभागाकडे बिबट्याचा वावर असलेल्या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जिवाची जोखीम घेऊन शेतांमध्ये जाण्याची वेळ येऊ देण्याऐवजी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!