कात्यायनी ज्वेलर्स दरोड्यातील टोळीतील दोन संशयितांना ३६ तासात मुद्देमालासह अटक

कात्यायनी ज्वेलर्स दरोड्यातील टोळीतील दोन संशयितांना ३६ तासात मुद्देमालासह अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी)
करवीर तालुक्यातील बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकलेल्या टोळीतील दोन संशयितांना ३६ तासात अटक, ३७ तोळयांचे सोने-चारचाकी-दुचाकी असं ३० लाखांचं साहित्य जप्त, उर्वरीत पाच संशयितांचा शोध सुरू
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची कामगिरी.
कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथे काल पडलेल्या दरोड्यातील आरोपी पकडण्यामध्ये स्थानिक गुन्हा अन्वेषण कोल्हापूर विभागाच्या पथकाला यश आरोपी विशाल धनाजी वरेकर (वय 32, रा. आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलजवळ,कोपार्डे ता. करवीर जि.कोल्हापूर) व सतीश सखाराम पोहाळकर (वय 37, रा. कणेरकर नगर, रिंग रोड, फुलेवाडी, कोल्हापूर) या दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या दरोड्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दरोड्यातील मुख्य आरोपी पोहाळकर हा सराफी व्यापारी असून त्यांनी कुडित्रे व परराज्यातील सहकाऱ्यांच्या साह्याने सदर दरोडा घातल्याचे निष्पन्न झालले असुन
पोहळकर याचे बालिंगे गावात शेजारीच सोन्याचे दुकान होते. याच्याविरुद्ध मागच्या वर्षी बलिंग्यातील लोकांचे सोने घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यामध्ये त्याला अटक होऊन तो जेल मध्ये होता. जेलमध्येच त्याने हे कारस्थान रचले असावे.
हेल्मेट घातलेला पोहलकर व बाकीचे आरोपी कुडीत्रे येथील आहेत. फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, विनायक सपाटे, शेष मोरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महादेव कुहाडे तसेच पोलीस अंमलदार वसंत पिंगळे, रणजित कांबळे, रणजित पाटील, संजय हुंबे, संजय कुंभार, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, अजय वाडेकर, ओंकार परब, अमर वासुदेव, सचिन देसाई, अमर आडुळकर, प्रशांत कांबळे, विनोद चौगुले, सागर कांडगावे, अमित सर्जे, प्रितम मिठारी, सागर मानें, युवराज पाटील, नवनाथ कदम, संदीप गायकवाड, राजू कांबळे, प्रविण पाटील, आयुब गडकरी, विलास किरोळकर, नामदेव यादव, अनिल पास्ते, संतोष पाटील, अनिल जाधव, रफिक आवळकर, राजेंद्र वरंडेकर व स्वाती झुगर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!