शिवसेनेच्या तालुका संघटकपदी हारुण पठाण

*शिवसेनेच्या तालुका संघटकपदी हारुण पठाण*
गंगापूर (प्रतिनिधी) शिवसेनेच्या अल्पसंख्याक तालुका संघटकपदी हारुण पठाण यांची निवड

हारुण पठाण यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले असुन यात म्हटले आहे की तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र भाऊ जंजाळ कार्यसम्राट आमदार प्रा. रमेश पाटील बोरनारे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यक तालुका संघटक गंगापूर या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार व धर्मविर आनंद दिघे यांची शिकवण यांचा आपण सक्रीय पणे प्रचार आणि प्रसार करावा. तसेच पुढील काळात शिवसेना बळकटीकरण करण्यासाठी सर्व सामान्य युवकांच्या विकासात तसेच शेतकऱ्यांच्या विकासात भरीव कार्य कराल व शिवसेना संघटना मजबुतीने उभी करण्यासाठी प्रयत्न करावेत या नियुक्ती पत्रावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष काळणे, शिवसेना जिल्हा समन्वयक बाळासाहेब चव्हाण,शिवसेना तालुका प्रमुख अनिल चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!