गंगापूर तलाठी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी प्रशांत वनकर, सचिव पदी सतीश क्षीरसागर तर कोषाध्यक्ष पदी गणेश लोने यांची बिनविरोध निवड*
गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तलाठी संघाच्या तालुका अध्यक्षपदी प्रशांत वनकर, उप अध्यक्षपदी संदीप पवार, सचिव पदी सतीश क्षीरसागर तर कोषाध्यक्ष पदी गणेश लोने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे
गंगापूर तलाठी संघाची नवीन कार्यकारणी नेमणूक
तलाठी संघाचे राज्य अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. तालुका अध्यक्ष पदी प्रशांत वनकर, उपअध्यक्षपदी संदीप पवार, सचिवपदी सतीश क्षीरसागर तर कोषाध्यक्षपदी गणेश लोने यांची निवड करण्यात आली, तसेच महिला उपाध्यक्षपदी धनश्री खिंडार, सदस्य म्हणून अपरिन पटेल, गंगा जगताप आदींची निवड बिन विरोध करण्यात आली. यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष सतीश भदाणे, कृष्णा गायके, जरारे , बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते. नव नियुक्त कार्यकरणीला तहसीलदार सतीश सोनी यांनी शुभेच्छा दिल्या.