अचानकच गंगापूर शहरांमध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू. दुकानदारांची उडाली धांदल..

डाॅ अरुण ज-हाड यांचा अतिक्रमणांवर अचानक हातोडा


गंगापूर (प्रतिनिधी) उपविभागीय अधिकारी तथा नगरपालिकेचे प्रशासक डॉ अरुण ज-हाड यांनी आज सायंकाळी साडेसहा वाजेपासून तहसील कार्यालय आवारातुन रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यास सुरुवात करुन शहरातील मुख्य चौकासह रस्त्यावर येणारे अतिक्रमण दोन जेसीबीच्या साह्याने काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये रस्त्यावर असलेले अतिक्रमणामुळे नागरिकांची वाहने रस्त्यावर लागत असल्याने कार्यालयात जाण्यासाठी रस्ता राहत नसल्याने अधीका-यांना गाडी सोडून कार्यालयात पायी जाण्याची वेळ आल्याने तहसील आवारासह शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, आंबेडकर चौक, या ठिकाणचा मोठ्या प्रमाणे अतिक्रमण काढण्यासाठी दोन जेसीबी लावून संध्याकाळी अचानक अतिक्रमण काढण्याचा मोहीम विभागीय अधिकारी डॉ अरुण ज-हाड व तहसीलदार सतीश सोनी, अप्पर तहसीलदार आकाश दहादडे नायब तहसीलदार खैरनार,पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, तलाठी गणेश लोणे, महेश धुमाळ पोलीस प्रशासन अधिकारी व नगर परिषदेच्या कर्मचारी यांना घेऊन अतिक्रमण मोठ्या प्रमाणात काढण्यात आले आहे गंगापूर शहरातील अनाधिकृत अतिक्रमण काढणे सुरूच राहणार आहे. अतिक्रमण धारकांनी आपल्या दुकानासमोरील अतिक्रमण काढून घ्यावे अतिक्रमण मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ अरुण ज-हाड यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!