गंगापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना मोफत पाणी पुरवठा सेवेची आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते अमळनेर येथील मुंदडा यांच्या शेतातुन टॅंकरने सुरुवात


गंगापूर (प्रतिनिधी) मुंदडा बंधुंनी अमळनेर शिवारातील शेतातुन टंचाईग्रस्त गावांना मोफत पाणी पुरवठा सेवेला आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते टॅंकरने सुरुवात.


वैकुंठवासी ह.भ.प भक्तराज कन्हैयालालजी मुंदडा यांच्या स्मरणार्थ जलसेवा हीच ईश्वर सेवा कायम ठेवत २०१८ ते २०१९ नंतर पुन्हा १४ मार्च रोजी गंगापूर तालुक्यातील गावांसाठी मुंदडा बंधुंनी स्वतःच्या शेतातील पाणी कपात करून ज्या गावात भीषण पाणीटंचाई व दुष्काळ भासत आहे अशा गावांमध्ये शासकीय टँकर द्वारे पाणी देण्यात येत असुन पहिल्याच दिवशी २४ हजार लिटरचे २० टँकर ( ४ लाख ८० हजार लिटर) पाणी भरून देण्यात आले आहे. व दररोज २४ हजार लिटरचे ५० टँकर देण्याचा मुंदडा यांचा मानस आहे . या उद्घाटन सोहळ्याला गंगापूर खुलताबाद तालुक्याचे जलसम्राट जलनायक आमदार प्रशांत बंब व वैजापूरचे कार्यसम्राट आमदार रमेश बोरणारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रामेश्वर मुंदडा यांच्या शेतामध्ये उद्घाटन करण्यात आले.या वळी रामेश्वर मुंदडा, नंदकिशोर गांधिले, गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे, कृष्णकांत व्यवहारे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊसाहेब पदार, आप्पासाहेब पाचपुते व अमळनेर, लखमापूर, कायगाव व गणेशवाडी येथील माझे सर्व मित्र परिवार उपस्थित होते
गंगापूर तालुक्यात कोठेही पाण्याची टंचाई भासल्यास मोफत पाणी टँकर भरून देणार असल्याचे पंचायत समितीचे माजी सभापती सुमीत मुंदडा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!