नागरिकांनी बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू व रोख रक्कम बॅंकेत व सुरक्षित ठिकाणी ठेवा- पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले . गंगापूर शहरात रिक्षा लावुन जनजागृती.


गंगापूर शहरात रिक्षा लावुन जनजागृती.
गंगापूर (प्रतिनिधी) उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू व रोख रक्कम बॅंकेत व सुरक्षित ठिकाणी ठेवुन फिरायला चालल्याची माहिती सोशल मीडियावर टाकू नका – पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले.

घरातील लहान मुलांच्या शाळा, कॉलेज आणि नोकरीच्या व्यापात वर्षभर कुठेही फिरायला जाणे किंवा बाहेरगावी नातेवाईकांकडे जाण्याची कोणतीही संधीचं मिळत नाही. मात्र, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होताचं अनेक जण मोठ्या हौसेने कुटुंबासह बाहेरगावी जाण्याचा बेत आखतात. केवळ चार, आठ दिवसांसाठी बाहेर जाताना घराच्या सुरक्षीतेकडे मात्र साफ दुर्लक्ष केलं जातं. बाहेरगावी जाताना केवळ शेजारच्यांना घरावर लक्ष द्या, अशा प्रकारच्या सूचना केल्या जातात. मात्र,कितीही उपाय-योजना केल्या तरी चोरटे चोरट्यांच्या नजरा कुलूप बंद असलेल्या घरांवर खिळलेल्याचं असतात. संधी मिळताचं ज्या घराच्या मुख्य दाराला कुलूप लागलेलं आहे, अश्या घरांना टार्गेट करून घरातील लाखो रुपयांचा मौल्यवान ऐवचं लंपास केला जातो. गंगापूर शहराच्या अनेक भागात घरफोडीच्या घटना घडलेले आहेत. धक्कादायक म्हणजे यापैकी बहुतांश घराचे घर मालक हे बाहेरगावी फिरायला गेले असल्याची माहिती समोर आली आहे.
गंगापूर पोलिस स्टेशन परिसरात उन्हाळी वातावरण असल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे लग्नकार्यासाठी आपण बाहेरगावी जात असताना सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे अनेक दिवस घर बंद असतात अशावेळी चोरटे घराची पाहणी करून रात्री किंवा दिवसा चोरी करतात यासाठी बाहेर गावी जाताना शेजाऱ्यांना व स्थानिक पोलिसांना कळविणे आवश्यक आहे जेणेकरून त्या परिसरातील बंद घरावरती लक्ष ठेवता येईल तसेच रोख रक्कम घरात ठेवणे ऐवजी बँकेतील लाॅकर मध्ये ठेवावी आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या आपण सतर्क व सावधान रहावे असे आव्हान पोलीस निरीक्षक सत्यजित ताईवाले व गंगापूर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे.

*टूरची माहिती सोशल मीडियावर टाकू नका* – बाहेरगावी फिरायला जात असल्याची माहिती सोशल मीडियावर देणे, लांबच्या टूरवर जात असल्याचे स्टेटस टाकणे, डेस्टिनेशनवरील फोटो अपलोड करण्याची हौस आता सर्वांचा होते. मात्र, सोशल मीडियावर तुम्ही दिलेली माहिती चोरट्यांसाठी तुमच्या घरी कुणीही नसल्याची ‘टीप’ ठरू शकते. त्यामुळे टूर किव्हा बाहेरगावी जात माहिती सोशल मीडियावर शेअर करणे टाळावे.
उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!