उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांचा गौरव.

उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांचा गौरव.
गंगापूर (प्रतिनिधी) शिल्लेगाव पोलिस स्टेशनचे पो.नि. मच्छिंद्र सुरवसे यांचा विशेष पोलीस निरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण व पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी केला गौरव.

शिल्लेगाव पोलिस स्टेशनचे मच्छिंद्र तुकाराम सुरवसे, यांनी मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात खून, बलात्कार, हुंडाबळी, नवविवाहित यांना त्रास देणे, अशा काही गंभीर गुन्ह्यांमध्ये उत्कृष्ठ तपास करून आरोपीस जन्म ठेप, आणि १० वर्षापर्यंत शिक्षा झाल्या आहेत, या त्यांचे चांगल्या कामगिरीची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दाखल घेऊन १४ जुन रोजी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया , अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या हस्ते “प्रशस्ती पत्र” देऊन गौरण्यात आले आहे. त्यांचे या कामा मुळे जनमानसात कायद्याचा धाक आणि पीडित यांना न्याय मिळाल्याने समाधानाची भावना निर्माण झाली आहे. जनमानसात सिल्लेगाव पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण झाली असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!