अज्ञात चोरट्यांनी मंगलकार्यालय फोडून डेकोरेशनचे सामान केले लंपास…

अज्ञात चोरट्यांनी मंगलकार्यालय फोडून डेकोरेशनचे सामान लंपास केले. चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
गंगापूर (प्रतिनिधी)अज्ञात चोरट्यांनी मंगलकार्यालयातील पाच खोल्यांचे कुलुप तोडून पंचेचाळीस हजार रुपये किंमतीचे डेकोरेशनचे साहित्य चोरुन नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
 पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निलेश देविदास गावंडे राहणार संचेती कॉम्पलेक्स गंगापूर हे मंडप व्यवसाय करतात.  गंगापूर ते भेंडाळा फाटा रोडवरील विराज हॉटेलचे शेजारी असलेले साई मंगल कार्यालय त्यांनी भाडे तत्वावर चालवण्यासाठी घेतलेले आहे. सदर कार्यालयात मंडपचे डेकोरेशनचे सामान तीन ते चार महिन्यांपासून मंगल कार्यालयाच्या स्टॉक रुममध्ये ठेवून सदर गोदामाला व्यवस्थतीत कुलुप लावले होते. ६ जुन रोजी निलेश देविदास गावंडे हे संध्याकाळी साडे चार वाजेच्या सुमारास साई मंगल कार्यालयातील स्टॉक रूम जवळ गेले. तेव्हा कार्यालयातील सामान ठेवलेले एकूण पाच रुमचे कुलूप तुटलेले दिसले.कुलुप तोडलेल्या रुममध्ये जावून पाहणी केली असता संपूर्ण सामान अस्थाव्यस्थ दिसले. रुममधील सामानाची चोरट्यांनी चोरून नेल्याचे खात्री पटली. एकूण ४५ हजार रुपयांचे सामान चोरीस गेले. याप्रकरणी मंडप व्यावसायीक निलेश देविदास गावंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्याचा शोध गंगापूर पोलिस घेत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!