आमदार प्रशांत बंब यांच्या मागणीने मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांच्या तपासनीला गंगापूर तालुक्यात पथकामार्फत सुरूवात शिक्षकांचे धाबे दणाणले


गंगापूर (प्रतिनिधी) कर्मचारी व शिक्षक हे मुख्यालयी राहत नसल्याने आमदार प्रशांत बंब यांनी दोन वर्षांपूर्वी मुद्दा उचलुन धरल्याने जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पथक तयार करून मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा पंचनामा करण्यास सुरुवात केली असल्याने जिल्ह्यातील मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.


गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांनी मुख्यालयी न राहण्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुख्यालयी राहण्याचा आग्रह केल्यानंतर काही संघटना न्यायालयात गेल्या होत्या. काही काळ थांबलेला मुद्दा आमदार प्रशांत बंब यांच्या आरोप, टीकेनंतर पुन्हा चर्चेत आला.

त्यातच मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी शासनाच्या आदेशाचा संदर्भ देत मुख्यालयी रहा अन्यथा घरभाडे रोखण्याचा इशारा दिला. विशेष म्हणजे कारवाई न करणाऱ्या खातेप्रमुख आणि कार्यालयप्रमुख यांच्यावरच शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. या आदेशामुळे मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी व शिक्षकांचे धाबे दणाणले होते . आमदार प्रशांत बंब यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मिना यांना मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचारी व शिक्षकांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या असता त्यांनी आमदार प्रशांत बंब यांच्या सुचनेनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांची चौकशी पंचनामा करण्यासाठी पथक नेमले असुन गंगापूर तालुक्यात या पथकाने गंगापूर व जांमगाव केंद्रातील सहा शाळेतील शिक्षक गांवात राहतात की नाही व ते आणखी काही व्यवसाय करतात का याची गावातील नागरिकांकडे चौकशी करून पंचनामे केले आहे या पथकात पैठण येथील केंद्र प्रमुख स्वाती रामचंद्र थिगळे, व खंदाडे यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!