गंगापूर तालुक्यातील चार मंडळात दुष्काळ जाहीर करा नसता २५ नोव्हेंबर रोजी शेतकरी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा

गंगापूर (प्रतिनिधी) डोणगाव,जामगाव,गाजगाव,आसेगाव मंडळात सरसकट दुष्काळ जाहीर करा नसता “सामुदायिक बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

गंगापूर तहसीलदार व कृषी अधिकारी हजर नसल्याने १६ नोव्हेंबर रोजी नायब तहसीलदार खैरनार व कृषी लिपीक पागोटे यांना शेतकरी कृती समितीच्या इंजी.महेश गुजर, रायपूरचे गणेश देशमुख, फुलशिवरा किर्तीकर, पंकज नन्नवरे यांनी चुकीचे पंचनामे, पर्जन्यमान यंञ व अनुदान वाटप बाबत तक्रारी केलेल्या असताना आपल्याकडून ठोस कारवाई झालेली नाही.

त्यामुळे गंगापूर तालुक्यात जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्यमान ७५ टक्के पेक्षा कमी व एकूण पावसाच्या ७५० मीमी पेक्षा कमी पाऊस अशा अशा मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. मात्र, तालुक्यात सर्वत्र सारखाच पाऊस पडलेला असताना डोणगाव,जामगाव,गाजगाव ,आसेगाव मंडळ कोणत्या निकषावर वगळले? असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करीत आहेत.

यावर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांकडून खरिपाची लागवड करण्यात आली; मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले.पाऊस खंड २१ दिवसापेक्षा जास्त खंड पडलेला असताना व संपूर्ण पावसाळा सरासरी ७५० मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असताना सप्टेंबर अखेर केवळ ४३६ मिलिमीटर पाऊस झाला,जो की ५८ % एवढाच आहे.त्यामुळे डोणगाव,जामगाव,गाजगाव ,आसेगाव मंडळातील एका गावाला पाऊस,तर दुसरे गाव कोरडे पावसाअभावी कपाशीच्या पहिल्या वेचणीत पहाट्या झाल्याचे दिसत आहे अशी स्थिती दिसून आली असतांना व चुकीचे पर्जन्य मापन नोंदी घेतल्याच्या तक्रारी आपल्याकडे केलेली असताना.

डोणगाव,जामगाव,गाजगाव ,आसेगाव २१ दिवसापेक्षा जास्त खंड स्वरूपाचा पाऊस झाला,शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.
आहे तरीसुद्धा स्थानिक प्रशासनाने चुकीचे अहवाल पाठवल्या ने शासनाने तालुक्यातील डोणगाव,जामगाव,गाजगाव ,आसेगाव मंडळाकडे दुर्लक्ष केले आहे.तालुक्यात पावसाची परिस्थिती सारखीच असताना डोणगाव,जामगाव,गाजगाव ,आसेगाव महसूल मंडळ कोणत्या निकषावर वगळण्यात आले, याबाबत विचारणा होत असून वंचित मंडळातील शेतकरी संतप्त झाले आहेत.
या निवेदनाद्वारे आपणास विनंती करण्यात येते की दि २४ नोव्हेंबर २०२३ पर्यंत लिखीत स्वरूपात कळवावे,नसता दि २५ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११ पासुन “किसान क्रांती चौक पिंपळगाव दिवशी” येथे डोणगाव,जामगाव,गाजगाव ,आसेगाव मंडळांच्या शेतकर्याच्या वतीने “सामुदायिक बेमुदत आमरण उपोषण” करण्यात येईल याची आपण गांभिर्याने नोंद घ्यावी असे निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!