हाॅटेलमध्ये घुसून मालकाला मारहाण करून लुटना-या चोरट्यांच्या गंगापूर पोलीसांनी तिन तासात मुसक्या आवळल्या


गंगापूर (प्रतिनिधी) गंगापुर पोलीसांनी पाठलाग करून तिन तासाच जबरीचोरी करून फरार झालेले तीन सराईत चोरटयांना ढोरेगाव जवळील बंद पेट्रोल पंपावर मुद्देमालासह मुसक्या आवळल्या.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर महामार्गावरिल भेंडाळा फाट्याच्या पुढे नाहदी पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या महाराष्ट्र ढाबा येथे १५ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तीने हॉटेल मध्ये घुसून हॉटेलच्या कॅश काउंटर जवळ झोपलेले हॉटेल मालक फेरोज सांडू शेख वय २७ वर्षे रा. ढोरेगाव यांना लोखंडी सळईने मारहाण करून चाकुचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांचे हॉटेलच्या गल्यातील ९ हजार ७०० रूपये रोख रक्कम हिसकावुन घेवुन त्यांनी शाईन मोटरसायकल क्रमांक एम.एच. २० डी.पी. ५६४१ वर बसुन पळुन गेले.

असल्याची माहिती गंगापूर पोलीसांना मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी त्यांचे पथकासह तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी करून जबरीचोरी करणारे चोरट्यांचे गाडीचे व त्यांचे वर्णन फिर्यादी फेरोज शेख यांचे कडुन घेतले. तसेच अंधाराचा फायदा घेत तीन्ही चोरटे हे छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने सुसाट वेगात गेले असल्याची माहिती दिल्यावरुन पोलीस ठाणे गंगापूरला लागुन असलेल्या सर्व रोडवर नाकाबंदी लावण्यात येवुन संशयीत वाहन व व्यक्ती बाबत शोध सुरू करण्यात आला होता.

यावेळी पो.नि. ताईतवाले व त्यांचे पथक संशयीताचे मागावर असतांना त्यांना अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगरकडे कडे जाणारे महामार्गावरिल ईसारवाडी फाट्याच्या अलिकडे ढोरेगाव जवळील बंद असलेल्या ईसार कंपनीच्या पेट्रोलपंप जवळ काही संशयितांची हालचाल दिसुन आली.

यावरुन पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले , पो.उप.नि. अजहर शेख, पोलीस अंमलदार दिनकर थोरे, गंगावणे,अभिजीत डहाळे, अमोल कांबळे,तेजसिंग राठोड व त्यांचे पथकांने तात्काळ पेट्रोलपंपाच्या दिशने धाव घेवुन पोलिसांनी त्यांचे वाहन अलिकडेच उभे केले, अंधार असल्याने बंद असलेल्या ईसार पंपाच्या परिसरात लपत छपत गेले असता, तेथे काहि अंतरावर संशयितांची मोटरसायकल दिसुन आली. तसेच संशयीत व्यक्तीं या परिसरात लपून बसल्याचे हालचालींवरुन पोलीसांचे लक्षात आल्याने त्यांनी बंद असलेल्या ईसार पेट्रोल पंपाच्या परिसराला घेराव घालुन सापळा लावला पोलीसांचे पथक पुढे पुढे जात असतांना लपलेल्या व्यक्तींना पोलीसांची चाहुल लागताच त्यांनी अंधाराचा फायदा घेत शेतातील रस्त्याने सुसाट पळ काढला. यावेळी पोलीसांनी सुध्दा त्यांचा अंधारात पाठलाग केला अंधाराचा फायदा घेवुन पळुन जाण्याच्या प्रयत्नात असतांना पोलीसांनी या तिनही चोरट्यांना अत्यंत शिताफिने पहाटे साडेचार वाजेच्या सुमाराला मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले.
आरोपी जुबेर नासेर शेख, २९ वर्ष, शेख ईरफान शेख सरवर २७ वर्ष, रिझवान पाशेखान २८ वर्ष सर्व रा. नेहरूनगर, कटकटगेट, हत्तीसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर त्यांना पोलिसांनी विश्वासात विचारपुस केली असता त्यांनी हॉटेल मालक यांना मारहाण करून जबरीने हॉटेलच्या गल्ल्यातील ९ हजार ७०० रूपये रोख चोरुन पसार झाल्याचे कबुल केले.
त्यांचे ताब्यातुन हॉटेल मालकाकडुन जबरदस्तीने चोरून नेलेले ९७०० रूपये रोख, तीन मोबाईल, शाईन मोटरसायक,चाकु, असा एकुण ६३ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या विरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात भादंवी कलम ३९४,३४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन वरील गुन्हयात त्यांना अटक करण्यात आली आहे.
तिन्ही आरोपी हे सराईत असुन त्याचेवरती छत्रपती संभाजीनगर शहर येथे सुध्दा अनेक गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास गंगापुर पोलीस करित आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली,
पोेलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, पो.उप.नि. अजहर शेख, पोलीस अंमलदार दिनकर थोरे, गंगावणे,अभिजीत डहाळे, अमोल कांबळे, तेजसिंग राठोड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!