ग्रामविकास अधिकाऱ्यासोबत आरेरावी , ग्राम.पं. सदस्यपती मनसेचे तालुकाध्यक्ष चापे यांना भोवली.पोलिसांनी केली अटक

ग्रामविकास अधिकाऱ्यासोबत आरेरावी , ग्राम.पं. सदस्यपती मनसेचे तालुकाध्यक्ष चापे यांना भोवली.
पोलिसांनी केली अटक

वाळूज (प्रतिनिधी) ग्रामविकास अधिकारी सोबत आरेरावी ग्रामपंचायत सदस्यपतीला चांगलीच महागात पडली असून शर्टची कॉलर पकडून शिवीगाळ केल्या प्रकरणी सदस्य पती विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार २१ जुलै रोजी सकाळी १०.४५ वाजता घडली आहे मनसेचे तालुकाध्यक्ष .काकासाहेब मुरलीधर चापे रा. वाळूज, ता. गंगापूर असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वाळूज येथील ग्रामविकास अधिकारी उत्तम चांगदेव भोंडवे (रा. लासुर नाका ,गंगापूर ) हे आपल्या कार्यालयात शुक्रवारी सकाळी दहा वाजता बसलेले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विमलबाई चापे यांचे पती काकासाहेब चापे तेथे आला व माझ्या वार्डातील लाईट चालू करून दे ,तसेच माझ्या वार्डात मुरूम टाकून दे, असे म्हणाला. यावेळी भोंडवे यांनी मी सरपंचांना बोलून कारवाई करतो असे सांगताच चापे याचा पारा चढला. त्याने जोरात जोरात शिवीगाळ करत भोंडवे यांच्या अंगावर धावून गेला. तसेच कॉलर पकडून तुला पाहून घेतो धमकी दिली. याप्रकरणी उत्तम भोंडवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणला म्हणून वाळूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून चापे यास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!