जिल्हास्तरीय खो खो मुलांच्या स्पर्धेत मनूर जि. प. प्राथमिक शाळेने उपविजेतेपद मिळविले

पैठण (प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील मनूर -बाला नगर येथे जिल्हास्तरीय मुलांच्या खो खो स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत १९ ते १७ वयोगटातील प्रत्येकी १४ स्पर्धा घेण्यात आल्या. या मध्ये १७ वयोगटातील स्पर्धेमध्ये, मनूर प्रशालेने घवघवीत यश संपादन करून, १४ वयोगटामध्ये प्रशाला संघ उपविजेता राहिला.
या कामगिरीबद्दल मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक विजयकुमार दारुंटे यांनी विध्यार्ध्याचे अभिनंदन केले.
तसेच या उत्कृष्ट कामगिरी बद्दल शालेय समितीचे उपाध्यक्ष्य दत्तु वाघ, गोकुळ दौगे, यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.
सरपंच नितीन साळुंके, राजेंद्र उचित, योगेश तांबे, बाळु दौगे, राजु साळुंके नामदेव दौगे आदी सत्कार समारंभास उपस्थित होते. या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!