पैठण पंचायत समिती बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा सह बळीराजा सर्व्हे

पैठण पंचायत समिती बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा सह बळीराजा सर्व्हे

पैठण,दिं.१७.(प्रतिनिधी) : पैठण पंचायत समिती मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनील भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा सह बळीराजा सर्व्हे, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील अभाकार्ड ,गोल्डन कार्ड,बोगस डाॅक्टर आणि टिबी क्षयरोग अभियान बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी पैठण पंचायत समिती बांधकाम विभाग उप अभियंता संभाजीराव असोले यांनी उपस्थित तालुक्यातील ग्रामसेवक यांच्या ग्रामपंचायतींच्या सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनील भोकरे यांनी उपस्थित ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना दिं.२५ जुलै २०२३ पर्यंत बळीराजा सर्व्हे,हर घर नर्सरी,लंपी जनावरांच्या आजारा विषयी गावातील गोठ्या मध्ये फवारणी करावी व गावात प्रत्येकाने एक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जिम्मेदारी घेण्याचे आवाहन केले.

या बैठकीला पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी वने, पंचायत समिती बांधकाम उपविभागाचे उप अभियंता संभाजीराव असोले,तालुका आरोग्य अधिकारी डॉ अझर सैय्यद, ग्रामविकास अधिकारी नारायण पाडळे पाटील, बबन हलगडे पाटील, बाळकृष्ण गव्हाणे, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष खंडू वीर, सचिव अशोक आहेर, ग्रामसेवक पतसंस्थेचे सचिव सागर डोईफोडे, शाखा अभियंता गंगाधर निसरगंध, आदिनाथ जायभाय, नंदकिशोर मतसागर, नितीन निवारे,येडुबा कांबळे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे तालुकाध्यक्ष संदीप घालमे, ईश्वर सोमवंशी, संदीप एडके, मिर्झा परवेज मंजूर बेग,किशोर निकम,हरीष बांगर, राहूल वाघ, रमेश आघाव,मंचक भोसले,राजु दिलवाले,जिजाभाऊ मिसाळ,गाडेकर, वसंत इंगळे,बेबी राठोड,छाया गव्हाणे,वर्षा औटे,छाया जाधव,निर्मला कळसकर,आशा तुपे,ज्योती माहोरे, श्रीकृष्ण कांबळे,रंजीत पोकले, विनायक इंगोले, अमोल ठोंबरे,दिपक शिरसागर, संजय चोथे, सिध्दार्थ पवार,रवी जगधने, सुरेश उजगरे, विनायक लांडगे, रविंद्र दळे सह तालुक्यातील ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!