जनता सहकार’ संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला…

‘जनता सहकार’ संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला…

पैठण,दिं.२८.(प्रतिनिधी) :’जनता सहकार’ संस्थेचा वर्धापन दिन सोहळा उप विभागीय पोलिस अधीक्षक D.Y.S.P श्री सिध्देश्वर भोरे साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने पार पडला. या वर्धापन दीन सोहळ्या निमित्त100 हून अधिक सभासद खातेदार यांना भव्या कर्जवाटप चे आयोजन करण्यात आले होते
यावेळी मोठ्या संख्येने खातेदार सभासद व प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत 100 पेक्षा जास्त खातेदार, सभासदांना कर्ज वितरीत करण्यात आले आहे.

जनता सहकार संस्थेने नेहमी अत्याधुनिक बँकिंग सेवा देत विश्वास निर्माण करून एकूण 25 कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे तसेच असंख्य सभासदाचा असा विशाल परिवार आहे.जनता सहकार ग्रामीण भागातील सभासदांना केंद्र बिंदू मानून मुलभूत बँकिंग सुविधा देत आली आहे.यावेळी कार्यक्रमासाठी जनता सहकार संस्थेचे चे चेअरमन , डॉ. दिगंबर खनसे , व्हा.चेअरमन महेश बाबूराव पा. बोंबले,मुख्य कार्यकारी अधिकारी, महेश गिरजे साहेब , ॲड.उद्धव नजन साहेब, भागवत सुभाषराव पा. मोटकर, जयदीप खराद , कार्यक्रमाचे उद्घाटक उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे, सेवानिवृत्त प्राध्यापक पि. आर.मुळे, दामोधर उगले , बबन बोबडे,आसाराम खणसे आदी मान्यवरांनी संस्थेच्या अल्पावधीत झालेल्या प्रगती बाबत कौतून केले व 3 ऱ्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल बुलंद वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी सूत्रसंचालन रामेश्वर गोर्डे सर यांनी केले उपस्थीत पदाधिकारी अधिकारी, कर्मचारी, पिग्मी प्रतिनिधी तसेच शाखेच्या पंचक्रोशीतील व पैठण शहरातील नागरिक व्यापारी सर्व सभासद, खातेदार,कर्जदार उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!