पिकांवर होणारे दुष्परिणाम व त्यावर उपाययोजना कशा करायच्या याविषयी मार्गदर्शन करण्यात आले

पिकांवर होणारे दुष्परिणाम व त्यावर उपाययोजना कशा करायच्या याविषयी मार्गदर्शन करण्यात आले

पैठण (प्रतिनिधी)छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषी महाविद्यालय सातव्या क्षेत्रातील राज्यसेवा योजनेतील स्वयंसेवकांनी दिनांक २२ रोजी सकाळी दहा वाजता पैठण येथे जनजागृती करण्यात आली.
खरीप हंगाम सुरू असून सुद्धा पाऊस कमी पडल्यामुळे पिकांमध्ये पाण्याची कमतरता कमी भासू लागली व तसेच जनावरांमध्ये लंपी आजार हा जास्त पसरत असल्यामुळे या विषयाबद्दल जनजागृती करण्यासाठी त्यांनी पोरगाव येथील जनजागृती केली.
सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी हा वेगवेगळ्या अडचणींत सापडत आहे खरीप हंगाम सुरू असून देखील पाऊस कमी पडत आहे, बऱ्याच ठिकाणी त्यामध्ये पहिला पाऊस व नंतर त्यामध्ये खंड पडलेला दिसून येत आहे या सर्वांचा मोठा परिणाम हा पिकांवरती होत आहे. पिकांमध्ये पाण्याची कमतरता भासून येत आहे त्यामुळे वेगवेगळे आजार हे झाडांवरती येत आहे व पिकाची नुकसान होत आहे, त्यासाठीच शेतकऱ्याचे पेरलेले पिकाचे संरक्षण करण्यासाठी त्याचे संघर्ष चालू आहेत व तसेच जनावरांमध्ये लंपी हार्ट डिसीज जास्त आढळून येत आहे त्याविषयी गावांमध्ये जाऊन माहिती दिली व त्यावर उपायोजना कशाप्रकारे कराव्यात याची महिती व लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला . यावेळी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावामध्ये जाऊन भिंतीपत्रके लावून त्याविषयी जनजागृती केली याप्रसंगी गावातील सरपंच संगीता नीळ व ग्रामसेवक व्ही. व्ही.इंगोलेसह गावातील नागरिक उपस्थित होते
हा कार्यक्रम राबविण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे संचालक डॉ डी डी शेळके यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी. एस. बैनाडे डॉ ए भोंडवे यांनी सहकार्य लाभले‌. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाचे अधिकारी डॉ वाळजे ,वाघमारे हे प्रयत्न करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!