अमृत आवास अभियान अंतर्गत प्रधान मंत्री आवास योजना मध्ये बालानगर तर राज्यपुरस्कृत आवास मध्ये ढोरकीन प्रथम तसेच सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून ग्रामीण गृह निर्माण अभियंता अमोल राजकुमार शेळके

अमृत आवास अभियान अंतर्गत प्रधान मंत्री आवास योजना मध्ये बालानगर तर राज्यपुरस्कृत आवास मध्ये ढोरकीन प्रथम तसेच सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून ग्रामीण गृह निर्माण अभियंता अमोल राजकुमार शेळके तर राज्यपुरस्कृत आवास योजनेंतर्गत कुंदन भालेराव यांनी सर्वोत्कृष्ट क्लस्टरचा पुरस्कार पटकावला.

पैठण,दिं.६.(प्रतिनिधी): अमृत आवास अभियान 2022 -2023 प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामपंचायत बालानगर प्रथम,कडेठाण (बु) द्वितीय तर पाचोड (बु) ग्रामपंचायतने तृतीय पुरस्कार घरकुल पुर्ण करण्याच्या कामात पटकावला.
तसेच राज्यपुरस्कृत आवास योजनेंतर्गत ग्रामपंचायत ढोरकीन प्रथम,ग्रामपंचायत मुधलवाडी द्वितीय तर पिंपळवाडी (पी) ग्रामपंचायतने तृतीय क्रमांक पटकावला.
त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून ग्रामीण गृह निर्माण अभियंता अमोल राजकुमार शेळके तर राज्यपुरस्कृत आवास योजनेंतर्गत कुंदन भालेराव यांनी सर्वोत्कृष्ट क्लस्टरचा पुरस्कार पटकावला.
माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री विलास बापू भुमरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामपंचायत बालानगर प्रथम,ग्रामपंचायत कडेठाण (बु) द्वितीय, तर पाचोड (बु) ने तालूका स्तरीय तृतीय पुरस्कार पटकावला.
राज्यपुरस्कृत आवास योजनेंतर्गत ग्रामपंचायत ढोरकीन प्रथम,ग्रामपंचायत मुधलवाडी द्वितीय,तर ग्रामपंचायत पिंपळवाडी(पी) ने तृतीय पुरस्कार पटकावला.
तसेच प्रधान मंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून ग्रामीण गृह निर्माण अभियंता अमोल शेळके,तर राज्यपुरस्कृत आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून ग्रामीण गृह निर्माण अभियंता कुंदन भालेराव यांनी पुरस्कार पटकावला
याप्रसंगी गटविकास अधिकारी सौ.उषा मोरे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी किशोर निकम व राजेश कांबळे,विस्तार अधिकारी सुनील इंगळे व दशरथ खराद,ग्रामविकास अधिकारी जिजाभाऊ मिसाळ,घरकुल विभाग प्रमुख अविनाश चपडे, विजय वाघ,संगणक परिचालक दिनेश सवणे,ग्रामीण गृह निर्माण अभियंता अमोल शेळके,कुंदन भालेराव, अजय राऊत व राज भालेराव हे उपस्थित होते.
ग्रामपंचायत बालानगर सरपंच सौ वंदनाताई सोपान भालेकर, बाबासाहेब भालेकर,दादासाहेब भालेकर,हरिभाऊ कासोळे,सुभाष थोरात,कडेठाण (बु)ग्रामसेवक विष्णु शिंदे व सरपंच सौ प्रतिभा संभाजी तवार,ढोरकीनचे ग्रामविकास अधिकारी हरिष बांगर,उपसरपंच जावेद शेख व चेअरमन बाबासाहेब मुळे, मुधलवाडीचे ग्रामविकास अधिकारी राधाकिसन चौधरी,सरपंच सौ मनीषाताई भरत मुगुटमल, माजी सरपंच काकासाहेब बर्वे,पिंपळवाडी (पी) सरपंच सौ.रेणुका दिलवाले,उपसरपंच दादासाहेब गलांडे व ग्रामविकास अधिकारी वसंत इंगळे यांनी पुरस्कार स्वीकारले यावेळी दिपक ढाकणे,लाला कुरेशी,सोनू पोकळे,सोनु गव्हाणे, कैलास मदन,भरत मुकुटमल, सुशिल बोडखे, शिवाजी जाधव, लाला जाधव, सतिश लबडे,विक्रम आढाव, सुरेश शिंदे, रघुनाथ डाके, ग्रामविकास अधिकारी राधाकृष्ण चौधरी, पोपट ढाकणे सह आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!