अनैतिक संबंधास नकार दिल्याने महिलेच्या पतीवर एकाचा प्राणघातक हल्ला….पतीची मृत्यूशी झुंज .आरोपी फरार

अनैतिक संबंधास नकार दिल्याने महिलेच्या पतीवर एकाचा प्राणघातक हल्ला *पतीची मृत्यूशी झुंज*
आरोपी फरार
पैठण तालुक्यातील घटना.
पैठण (प्रतिनिधी) माझ्याशी संबंध ठेव नसता तुझ्या नव-याला मारुन टाकण्याची धमकी देणाऱ्या आरोपींने महिलेच्या नव-यावर कु-हाडीने सपासप वार करुन गंभीर जखमी केले ही घटना १० जुन रोजी पैठण तालुक्यातील औंरगपुरवाडी येथे सायंकाळी साडेसहा वाजता घडली असून यातील आरोपी अजुनही मोकाट.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव दगडु गायकवाड ३५ रा औरंगपुरवाडी ता पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की १० जुन गावातिल मित्र विलास रावसाहेब भवर व ज्ञानेश्वर सोमिनाथ गायकवाड 06.30 वाजेच्या सुमारास घरी आले व विलास भवर यांची गाय सुटल्याने आम्ही तिघ मित्र विलास भवर याच्या खळ्याकडे जाण्यासाठी पाई निघालो असता काकासाहेब भवर यांचे घरासमोरुन रस्त्याने जात असताना पाठीमागुन गावातिल विक्रम रामभाऊ भवर हा त्याच्या हातात कु-हाड घेवुन आमच्याकडे पळत आला व काही एक न बोलता त्यांनी त्याचे हातातिल कु-हाड उध्दव यांच्या डोक्यात मारले व काही कळायच्या आत त्यांने चार पाच वार केले विक्रम यांने कु-हाडिने मारल्याने डाव्या खाद्याला, डाव्या दंडाला पाठिला व गालावर वार केल्याने गंभीर जखमी झाले सदरचा प्रकार पाहुन सोबतचे मित्र विलास भवर व ज्ञानेश्वर गायकवाड हे भाडण सोडविण्यास पुढे आले असता विक्रम याने त्यांना धमकि दिली की तुम्ही मध्ये येवु नका तुम्ही मध्ये आला तर तुम्हाला मारुन टाकिन अशा धमक्या दिल्याने विलास व ज्ञानेश्वर तेथुन पळुन गेले व विक्रम कु-हाडिने मारहाण करित असल्याने आरडाओरडा ऐकून मोठा भाऊ संतोष गायकवाड व पत्नी यांनी विक्रम याच्या तावडितून सोडविले बेशुद्धावस्थेत गायकवाड यांना छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले पुढे फिर्यादीत म्हटले की “विक्रम भवर हा यापुर्वी पत्नी सोनाली हिच्या मागावर होता व तो पत्नीला माझ्या सोबत संबंध ठेव असे म्हणायचा तेव्हा सोनाली हिने घडलेला प्रकार सांगितला तेव्हा विक्रम यास समजावुन सांगितले होते व अमची बदनामी होईल म्हणुन विक्रम याच्या विरुद्ध तक्रार दिली नव्हती परंतु विक्रम याची अजुनच हिम्मत वाढली व तो सोनाली हिचा पाठलाग करायचा व तिला धमकी द्यायचा की तु माझ्या सोबत संबंध ठेवले नाही तर मी तुझ्या नव-याला मारुन टाकिन असे म्हणुन धमक्या द्यायचा व याच कारणावरुन विक्रम रामभाऊ भवर यांने काल १० जुन रोजी सायंकाळी 06.30 वाजेच्या सुमारास औरंगपुरवाडी येथे काकासाहेब भवर याच्या घरासमोर कु-हाडिने मारहाण करून डोके फोडुन व हातावर दंडावर, पाठीवर, गालावर मारुन जबर जखमी केल्याप्रकरणी विक्रम रामभाऊ भवर यांच्याविरुद्ध बिडकीन पोलिस स्टेशनमध्ये भादवी कलम ३०७, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अजुनही अटक केली नसल्याचा आरोप फिर्यादीच्या नातेवाईकांनी केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!