गंगापूर येथील खाजगी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला असल्याचा नातेवाईकांनी केला आरोप…प्रेत ताब्यात घेण्यास नकार

गंगापूर येथील खाजगी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला असल्याचा नातेवाईकांनी केला आरोप…
जोपर्यंत डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेताला हात लावणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला…


गंगापूर (प्रतिनिधी) खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणलेल्या २३ वर्षीय महिलेला दवाखान्यात दाखल करुन न घेतल्याने महिलेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून जोपर्यंत डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेताला हात लावणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला
गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना धारेवर धरले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दया अरुण काळे २३ राहणार गंगापूर यांच्या पोटात ५ ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता शहरातील एका खाजगी दवाखान्यात नातेवाईकांनी उपचारासाठी आणले असता नामांकित दवाखान्यात महिलेला दाखल करण्यास नकार दिल्याने तिला नातेवाईकांनी तिला घरी घेऊन गेले असता तिची प्रकृती खालावल्याने तिला ६ ऑगस्ट रोजी पहाटे येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी महिलेला तपासून मृत घोषित केले यामुळे संतप्त नातेवाईकांनी खाजगी दवाखान्यात जाऊन धिंगाणा घालत डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली वेळेवर पोलिस उपनिरीक्षक अझर शेख, पोहेका राहुल वडमारे आदी पोलिसांनी नातेवाइकांची समजुत काढून पोलिस स्टेशनमध्ये आणले असता नातेवाईकांनी उपचारासाठी डॉक्टरनी नाकार दिल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे


जोपर्यंत डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेताला हात लावणार नाही असा पवित्रा घेतला पोलिसांनी मध्यस्थी करून दया काळेचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले आहे शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समजेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!