किरकोळ वादातून कारकीन येथे पतीने पत्नीला कुऱ्हाडीचे घाव घालून ठार केले पतीला अटक

पैठण (प्रतिनिधी) पती-पत्नीच्या झालेल्या वादातून पतीने पत्नीवर कु-हाडीने वार करून पत्नीला ठार केले. ही घटना शुक्रवार ३ नोव्हेंबर दुपारी घडली. खून करून पळून जात असताना आरोपी पतीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या ही घटना एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कारकीन येथे घडली
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारकीन येथील आतिष रावसाहेब ताकवले (वय २५) याचा पत्नी सोनाली आतिष ताकवले (वय २२) हिच्यासोबत आज दुपारी वाद झाला. या वादातून पती आतिष ताकवले यांनी रागाच्या भरात पत्नीवर कुऱ्हाडीने गळ्यावर व पोटावर तीन ते चार वार केल्यामुळे पत्नी सोनाली रक्ताच्या थारोळ्यात कोसळली पत्नी बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच तो पळून जाऊन लागला असता पोलिसांना घटनेची माहिती मिळल्याने पळुन जाणाऱ्या पतीच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे जमादार राजेश चव्हाण यांनी मुसक्या आवळल्या व आरोपीला तत्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, सपोनि निलेश खेळे, जमादार करतासिंग सिंगल यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करत आहेत. मृत महिलेला एक मुलगी असून तिचे माहेर गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!