श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर येथे वाणिज्य मंडळाचे उद्घाटन

गंगापूर (प्रतिनिधी) श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर येथील वाणिज्य विभागातर्फे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अनेक उपक्रम राबवले जातात.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्यामध्ये दडलेल्या सुप्त गुणांना वाव मिळतो. वाणिज्य मंडळ सर्व विद्यार्थ्यांमधून निवडणूक घेतली जाते. निवडून आलेले विद्यार्थी वाणिज्य मंडळाच्या कार्यकारणी मध्ये काम करतात. या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव कोषाध्यक्ष व सदस्य असे कार्यकारणी निवडली जाते. निवडलेली कार्यकारणी महाविद्यालयांमध्ये वाणिज्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन करते. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन सूत्रसंचालन करणे, आभार प्रदर्शन हे सर्व विद्यार्थीच करत असतात. वाणिज्य मंडळाचे उद्घाटन ४ ऑक्टोबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गंगापूर येथील प्राचार्य एस.पी. नागरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर डॉ. सी एस. पाटील होत्या. निवड झालेल्या वाणिज्य मंडळ कार्यकारिणीचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्य एस.पी. नागरे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाची माहिती दिली. तसेच हा अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे. कारण एखाद्या महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारची कार्यकारणी निवड करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे होय. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघटन कौशल्य वक्तृत्व निर्माण होते व अभ्यासाची गोडी देखील लागते.

अध्यक्ष समारोप करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणाल्या की, वाणिज्य मंडळ स्थापीत जरी झाले असले तरी मंडळाबाहेरचे विद्यार्थी सातत कार्यरत राहिले पाहिजे. यामुळे त्यांना मंडळाच्या कार्यक्रमाची जाणिव होते आणि हा अनुभव त्यांना कामास येतो .पोस्टर्स करणं म्हणजे त्या विषयाचा अभ्यास करणे होय. यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी वेगळ्या प्रकारचा अनुभव आणि आत्मविश्‍वास वाढीस लागतो. इवढेच नाही तर भविष्यासाठी एक सुंदर अनुभव घेऊन हे विद्यार्थी बाहेर पडतात. “एकमेका साहाय्य करूं, अवघे धरु सुपंथ” या उक्ति प्रमाणे उपकर्माची गुणवत्ता सुधारेल. नेहमी संयुक्त सहयोग मध्ये काम पहा. पुढच्या वर्षी नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातलेले आहे. त्यामुळे शिक्षण मध्ये लवचिकता आलीच पाहीजे. NEP बदलल चर्चा होणे अनिवार्य आहे. विद्यार्थीनी कॉलेजला स्वत:चे घर समजून चिहीबाजुने लक्ष ठेवले पाहीजे ही एक सामाजिक जबाबदारी आहे. कॉलेज आवरामध्ये कोणताही कार्यकर्मा असु दे विद्यार्थी धावत आला पाहीजे . त्याचे कारण असे की कार्यक्रम हे विध्यार्थ्यासाठी असतात. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारा हा अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो व त्यांचे महाविद्यालयामध्ये उपस्थितचे प्रमाण देखील वाढण्यास मदत होते. विद्यार्थी स्वतः सहभागी झाल्यामुळे निश्चित त्याला अनेक प्रत्यक्षरीत्या स्वतः केल्यामुळे अनुभव येतो. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन केले त्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी.टी पवार, उपप्राचार्य डॉ. वैशाली बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. संदीप गायकवाड, डॉ. दीपक निकम, डॉ. अंकुश पाडळे व सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजनी व कल्याणी या विद्यार्थिनी केले तर आभार प्रदर्शन प्रीतीने केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!