मोबाईल चोर विधी संघर्ष बालकाला गंगापूर पोलिस व नागरिकांनी मध्यरात्री अटक केली.


गंगापूर (प्रतिनिधी) चोरीच्या तयारीत असलेल्या विधी संघर्ष बालकाला गंगापूर पोलिस व नागरिक पाठलाग करुन पकडले.त्याच्या ताब्यातील चार मोबाईल व एक मोटारसायकल असा २ दोन लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सतरा वर्षांच्या विधी संघर्ष बालक रा. वडाळा महादेव जिल्हा अहमदनगर व आणखी एक जण याला २० मार्च रोजी एक वाजेच्या सुमारास गंगापूर शहरातील भैरवनाथ नगर तीन कोणी चौकात संशयित रित्या फिरत असताना स्थानिक नागरिकांनी पाहून याची माहिती पोलिसांना दिली व त्याला नागरिक व पोलीसांनी पकडले यातील एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळाला तर विधी संघर्ष बालका जवळ असलेली स्पोर्ट बाईक किंमत २ लाख २५ हजार व चार विवो कंपनीचे मोबाईल व लोखंडी कॊणी व मिरची पावडर असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या विधी संघर्ष बालकावर पोस्टे उस्मानपुरा,एम आय डी सी वाळूज व वाळूज येथे बळजबरीने मोबाईल हिसकावून घेऊन जाण्याचे (३९२) सारखे गुन्हे दाखल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!