सततची नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून नवीन कायगांवच्या शेतकऱ्याची आत्महत्या


गंगापूर (प्रतिनिधी)
शेतात पिकांसाठी केलेला खर्च तरीही अपेक्षीत उत्‍पन्‍न मिळाले नाही. शिवाय शेतीच्‍या खर्चासाठी उचलेल्‍या कर्जाची फेड कशी करायची; या विवंचनेतून नवीन कायगांव येथील संजय ईष्टके या शेतकऱ्याने घरातील हुकला गळफास लावून आत्‍महत्‍या केली.
गंगापूर तालुक्यातील नवीन कायगांव येथील रहिवासी संजय कडु ईष्टके (वय ४३) यांनी ११ मार्च रोजी दुपारी तीन वाजेदरम्यान राहत्या घरातील हुकला गळफास घेतला असता चार वाजता मुलगी शाळेतुन घरी आली असता तिने दरवाजा उघडला असता समोर वडील फासावर लटकलेले दिसल्यावर मुलीने आरडाओरडा केल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांना धाव घेऊन ईष्टके यांना खाली उतरून गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तालुक्यातील नवीन कायगांव येथील शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
शेतीसाठी तीन ते पाच लाख रुपयांचे कर्ज खाजगी लोकांकडून व बॅंकेकडुन घतले होते. सततच्या नापिकीमुळे कर्ज फेडीची चिंता त्यांना होती. त्या विवंचनेत त्यांनी राहत्या घरातील हुकला ११ मार्च रोजी दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!