मराठवाड्याची दुष्काळी ओळख लवकरच मिटवणार असून मराठवाड्यासाठी आम्ही जल आराखडे तयार करून कामाला सुरुवात केली. विकास पुरुष आमदार बंब म्हणजे मुर्ती लहान पण किर्ती महान-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गंगापूर (प्रतिनिधी) विकास पुरुष आमदार प्रशांत बंब म्हणजे मुर्ती लहान पण किर्ती महान असून प्रशांत बंब यांनी कल्पकता वापरून जे प्रकल्प मतदारसंघामध्ये आणले तितके प्रकल्प इतर कोणत्याच आमदारांनी आणले नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन जवळील आरापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणीस यांच्या शुभहस्ते गंगापूर जल उपसा सिंचन योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले की मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आतापर्यंत पळवण्यात आले मात्र आपले सरकार आल्यानंतर माझ्याकडे सिंचन विभाग आल्यानंतर मराठवाड्यातील प्रकल्पांना 31 हजार 751 कोटी रुपयांची सुधारित मान्यता आपण दिली त्यात मराठवाड्यातील अनेक जलसिंचन प्रकल्पाचा समावेश असून कल्पकतेतून अनेक जलसिंचन प्रकल्प प्रशांत बंब यांनी मतदारसंघात खेचून आणले राज्यातील एकमेव आमदार प्रशांत बंब आहेत कीं त्यांनी सर्वात जास्त निधी मतदारसंघाला खेचून आणला गंगापूर तालुक्यात खेचून आणलेल्या बजाजच्या सीएसआर निधीतून तब्बल 200 कोटी रुपयांचे जलयुक्त शिवार योजनेतून अनेक गावे पाणीदार केले हे वाखान्यांजोगे असल्याचेही उपमुख्यमंत्री यांनी सांगून आमदार प्रशांत बंब म्हणजे मुर्ती लहान पण किर्ती महान असून प्रशांत बंब यांनी कल्पकता वापरून जे प्रकल्प मतदारसंघामध्ये आणले तितके प्रकल्प इतर कोणत्याच आमदारांनी केले नाहीत गंगापूर जल उपसा सिंचन योजना गंगापूर तालुक्यासाठी ऐतिहासिक क्षण, असून हजारो शेतकऱ्यांची स्वप्नपूर्ती होणार या योजनेमुळे गंगापूर तालुक्यातील ४० गावांमधील ३० हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार असून शेतकऱ्यांना यामुळे फायदा होईल असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान या कार्यक्रमामध्ये कामगार कल्याण संच, महिला आरोग्य संच, आयुष्यमान भारत कार्ड, संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी कार्ड, उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी यांनी कार्ड तसेच खेळाडूंना क्रिडा साहित्य चे वाटप करण्यात आले केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे, आमदार हरिभाऊ बागडे नाना, आमदार संदीपान भुबरे, जलसंपदा सचिव दिपक कपूर, जलसंपदा मुख्य अभियंता विजय घोगरे, भाजपा जिल्हाध्यक्ष शिरीषजी बोराळकर, लासूर स्टेशन बाजार समितीचे सभापती शेषराव नाना जाधव, भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण सर्व संचालक, तालुकाप्रमुख यांच्यासह मतदारसंघातील हजारो शेतकरी, भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे:
१. जय जवान, जय किसान चा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी आहे, आजचा गंगापूर चा कार्यक्रम ‘जय किसान’ चा नारा देणारा आहे.

२. गंगापूर मध्ये गंगा नाव आहे परंतु गाव तहानलेले होते. येथे पिण्याचा पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न होता.

३. ३० जून २०२३ ला आलो तेव्हा जलजीवन मिशन उद्घाटन केले तेव्हा ‘गंगापूर उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीची प्रत’ आणली होती व सांगितले होते, जानेवारी मध्ये कामाच्या भूमीपूजनाला मी पुन्हा येईल.

४. शेतकऱ्यांना थेट त्यांच्या शेतात ठिबक सिंचनातून पाणी पुरवठा करणारी महाराष्ट्रातील एकमेव योजना आमदार प्रशांत बंब यांनी मंजूर करून आणलेली आहे.

५. गंगापूर सिंचन उपसा प्रकल्पाला लागणारी वीज उपलब्ध होण्यासाठी सोलार प्रकल्प मंजूर करून देणार आहोत.

६. मराठवाड्याची दुष्काळी ओळख आता मिटली पाहिजे म्हणून मराठवाड्यासाठी आम्ही जल आराखडे तयार करून अनेक प्रकल्प मंजूर केले व गोदावरीच्या खोर्‍यात पाणी आणण्याचे काम केले.

७. मराठवाड्यातील या पिढीने दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही.

८. मराठवाड्याचे पळवलेले हक्काचे पाणी परत मराठवाड्याला कृष्ण खोऱ्यातून आणून देण्याचे काम आपल्या सरकारने केले. येत्या दीड वर्षात आपल्या येथे पाणी पोहचेल!

९. मराठवाड्यासाठी रु. ३१,७५१ कोटी रुपयांच्या विविध योजना मंजूर केल्यामुळे ४ लाख ६९ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

१०. गंगापूर मतदारसंघात जलयुक्त शिवार योजनेचे प्रभावी काम प्रशांत बंब यांनी केल्यामुळेच मतदारसंघ दुष्काळमुक्त होवू शकला.

११. नैसर्गिक शेती मिशन च्या माध्यमातून विषमुक्त शेतीचे मोठे काम आपल्याला करायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!