जामगाव ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

गंगापूर (प्रतिनिधी) राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय जामगाव येथे महिला ग्रामसभा व स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच बशीर पटेल यांनी दोन्ही महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महापुरुषाचे विचार आपल्याला प्रेरणा देतात स्वातंत्र्य लढ्यामध्ये या दोन्ही महापुरुषांचे योगदान मोठे असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी सदस्य भगवान ठवाळ, संपत रोडगे, अंकुश मोरे, दीपक जगताप, रामभाऊ ठोंबरे, पोपट तुपलोंढे, किशोर नवगिरे, रावसाहेब तुपे, सोमनाथ काळे, सुखदेव रोडगे आदींसह गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!