राज्यस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धांमध्ये मुलातुन वेदांत बोडखे तर मुलीमधुन सृष्टी शिंदे हीने प्रथम क्रमांक पटकावला

 

गंगापूर (प्रतिनिधी) रथसप्तमी – २०२४ जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ममदापूर येथे राज्यस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धा संपन्न.

मुलातुन वेदांत बोडखे – प्रथम क्रमांक तर मुलीमधुन सृष्टी दत्तप्रसाद शिंदे हीने प्रथम क्रमांक पटकावला

 

सूर्यनमस्कार प्रशिक्षण आणि स्पर्धेमध्ये ७८ पैकी उपस्थित ७५ विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे सूर्यनमस्कार केले. दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्वांनी योगा मॅट, पाण्याची बाटली सोबत आणली.

योगाभ्यासातून शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास साधला जातो. सूर्यनमस्कार ही क्रिया आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाची आणि मोलाची आहे. हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून निरामय आरोग्य स्वस्थ भारत’ करिता अंबड तालुका प्रशासन – शिक्षण व आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना, दानशूर सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र योगशिक्षक संघ, क्रीडा भारती आणि मॉर्डन व्यायाम शाळा व सांस्कृतिक क्रीडा मंडळ, अखिल भारतीय मारवाडी युवा मंच अंबड जिल्हा जालना यांनी छत्रपती योग केंद्र, अंबड येथे योगगुरु देवा चित्राल सर आणि पूर्ण नियोजन समिती टीम मधील योगसाधकांच्या मदतीने राज्यस्तरीय सूर्यनमस्कार प्रशिक्षण आणि स्पर्धा १३ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. राज्यस्तरीय सूर्यनमस्कार प्रशिक्षण आणि स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना योगसाधक शिक्षकांच्या मदतीने प्रात्यक्षिक घेण्यात आले या स्पर्धा राज्यभर सुरू आहे.

त्यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील योगशिक्षिका सुरेखा दत्तात्रय गरगडे व डॉ. दत्तात्रय रामभाऊ गरगडे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ममदापूर शाळेमध्ये रथ सप्तमी जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. योगशिक्षिका सुरेखा गरगडे यांनी मंत्रोच्चारासहित शास्त्रोक्त पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना अगोदर सूर्यनमस्काराच्या सर्व पद्धती प्रात्यक्षिक रूपाने करून दाखवल्या व त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची सामूहिक खुली स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी छान सूर्यनमस्कार केले त्यांची निवड परीक्षक डॉ.दत्तात्रय गरगडे यांनी केली या स्पर्धेमध्ये मुले गट:-

१)वेदांत प्रशांत बोडखे – प्रथम क्रमांक

२)प्रथमेश सुधाकर बोडखे – द्वितीय

३)आवेज इस्माईल पठाण – तृतीय

श्याम कृष्णा बर्डे – उत्तेजनार्थ

मुली गट:-

१)सृष्टी दत्तप्रसाद शिंदे – प्रथम क्रमांक

२)श्रावणी किरण शिंदे – द्वितीय क्रमांक

३)जोया फिरोज शेख-तृतीय क्रमांक

काव्या अमोल रणपिसे- उत्तेजनार्थ

वरील विद्यार्थी स्पर्धेतील बक्षीस पात्र ठरले.

प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. द्वितीय व तृतीय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले व उर्वरित सहभागी विद्यार्थ्यांना चॉकलेट्स देण्यात आले.

यावेळी . गरगडे यांनी विद्यार्थ्यांना आहार -विहार आरोग्याच्या सवयी, कच्च्या भाज्यांचा आहारात समावेश करणे, चहा न पिणे अशा महत्त्वाच्या जीवनशैलीतल्या टिप्स दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीप काळे यांनी केले. सूत्रसंचालन रामदास वजरे यांनी केले. तर आभारप्रदर्शन जयप्रभा कोकाटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!