शिर्डी येथील तरुणाने गंगापूर शिवारात घेतला गळफास.हत्या की आत्महत्या चर्चेला उधाण.


  • गंगापूर (प्रतिनिधी) शिर्डी येथील तरुणाने गंगापूर शिवारात गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे
    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर कायगाव रोड वरती इंडियन गॅस समोर ९ फेब्रुवारी रोजी एका शेतामध्ये एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळतात पोलिसांसह मोरया रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ ,सागर साळवे ,आकाश आमराव ,कुणाल पानकडे, शंकर खंडागळे यांच्या मदतीने घटनास्थळी जाऊन तो मृतदेहखाली काढून उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे शवविच्छेदनासाठी आणले असुन त्याची ओळख पटली असून मच्छिंद्र बाबुराव झिंजुडे राहणार सिद्धार्थ नगर ,सावळी विहार बुद्रुक,अहमदनगर शिर्डी येथील असल्याचे निष्पन्न झाले अशी माहिती पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी दिली आहे ही हत्या की आत्महत्या हे शवविच्छेदनानंतर माहिती होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!