उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतुन जिल्हाध्यक्ष गायब शहरात चर्चेला उधाण गंगापूरात दादांच्या राष्ट्रवादीत गटबाजीची खिचडी चव्हाट्यावर

गंगापूर (प्रतिनिधी) शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असून या दौऱ्यात दादां’च्या राष्ट्रवादीत गटबाजीची खिचडी चव्हाट्यावर आल्याची चर्चा जोरात सुरू आहे.


गंगापूर शहरांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरन २३ फेब्रुवारी रोजी सकाळी होणार असुन या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका जिल्हाभर वाटण्यात आल्या असून या पत्रिकेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांचे नाव गायब केले असून रस्त्यांवरील इलेक्ट्रीक पोलवर लावलेल्या फलकावर सुध्दा नाव व फोटो गायब झाले असल्याने तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन गट पडले असल्याचे चित्र दिसत आहे.
गंगापूर शहरांमध्ये राष्ट्रवादीची सुरवातीपासूनच दोन गट आहेत
दरम्यान कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आलेली आहे मात्र या निमंत्रण पत्रिकेमध्ये तसेच विविध ठिकाणी लावलेल्या फ्लेक्स वर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार कैलास पाटील यांचे नावच काय तर फोटो देखील लावण्यात आलेला नसल्यामुळे गंगापूर शहरांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे आज रोजी सुद्धा यात पहिला गट जिल्ह्याअध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील व शहराध्यक्ष यांचा तर दुसरा गट आमदार सतीश चव्हाण व अखिल भारतीय काँग्रेस मधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश मिळवलेले माजी नगराध्यक्ष यांचा असल्याचं बोललंजात आहे त्यामुळे गंगापूर शहरांमध्ये राष्ट्रवादीची दोन गट झाल्याचे बोलले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!