कांद्याला एक रुपया पाच पैसे भाव दिल्याने शेतक-यांनी बाजार समितीच्या आवारात केला अंत्यविधी

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ९ मे रोजी तालुक्यातील सिध्दपुर येथील एका शेतकऱ्याने एक ट्रॅक्टर कांदा विक्रीसाठी आणला होता परंतु या कांद्याला लिलाव झाल्यावर चक्क एक रुपया पाच पैसे किलोचा भाव मिळाल्याने या शेतकऱ्यांने सर्व कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर टाकून या घटनेचा निषेध म्हणून या कांद्याचा अंत्यविधी केला.
गंगापूर तालुक्यातील सिध्दपुर येथील शेतकरी गणेश गणगे यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास एक ट्रॅक्टर कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केट मध्ये आणला होता त्याची प्रतवारी चांगली असतांनाही येथील व्यापाऱ्यांनी या कांद्याला बोली लावून १०५ रुपये क्विंटल भाव लावला अशाप्रकारे मातीमोल भाव मिळाल्याने या शेतकऱ्यांने सर्व कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर टाकून दिला व म्हणाला की मला योग्य भाव न मिळाल्यास मी आत्महत्या करत आहे याचवेळी उपस्थित शेतकरी व पोलिस यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.
यानंतर संध्याकाळी गणेश गणगे यांना बरोबर घेऊन शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके यांनी त्या टाकलेल्या कांद्याचा विधीवत अंत्यविधी करून निषेध व्यक्त केला.

तिन दिवसांच्या आत गणेश गणगे यांच्या कांद्याला दहा रुपये किलो दराने भाव न दिल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांच्या वतीने मुंडन करून दहावा घालुन आंदोलन करण्यांत येईल असा इशारा शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!