महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार- आमदार सतीश चव्हाण

महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार- आमदार सतीश चव्हाण


गंगापूर(प्रतिनिधी) तालुक्यातील महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन आमदार सतीश चव्हाण यांनी दिले
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्क कार्यालयात २६ सप्टेंबर रोजी गंगापूर तालुक्यातील महिला भगिनींशी आमदार सतीश चव्हाण यांनी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या तसेच
गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी यांची आमदार सतीश चव्हाण यांनी भेट घेऊन तालुक्यातील विविध प्रश्नांविषयी चर्चा केली आणि लवकरात लवकर सदरील प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.


यावेळी माजी नगराध्यक्ष संजय जाधव, राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस सुवर्णाताई जाधव,, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश काळवणे, राजू पठाण,महिला जिल्हा सरचिटणीस संगीताताई वाघ, तालुकाअध्यक्ष मनीषाताई बत्तीसे,महिला शहराध्यक्ष कावेरीताई पाहूणे, उप शहराध्यक्ष शिलाताई जाधव, तालुका सचिव सुनीताताई सोळगे, शहर सचिव असल्लाबेगम जीलानी आदींसह महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!