गंगापूर येथील श्री मुक्तानंद महाविद्यालयाला मिळालेल्या नॅकच्या अ++ मानांकनानिमित्त म.शि.प्र.मंडळातर्फे कौतुक व स्नेह मिलन सोहळा संपन्न

गंगापूर येथील श्री मुक्तानंद महाविद्यालयाला मिळालेल्या नॅकच्या अ++ मानांकनानिमित्त म.शि.प्र.मंडळातर्फे कौतुक व स्नेह मिलन सोहळा संपन्न


गंगापूर (प्रतिनिधी) श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर येथे महाविद्यालयास मे-2023 मध्ये नॅकच्या चौथ्या पुनर्मूल्यांकनात अ++ दर्जा प्राप्त झाल्याबद्दल व महाविद्यालय ग्रामीण भागात राज्यामधून पहिले महाविद्यालय ठरल्याबद्दल कौतुक स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होतो. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य ॲड लक्ष्मणराव मनाळ, डॉ.प्रकाश भांडवलदार, त्रिंबकराव पाथ्रीकर, देवगिरी महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य पंडीतराव हर्षे, संजय जाधव, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सी.एस.पाटील, महाविद्यालय विकास समिती सदस्य सुवर्णा संजय जाधव, संतोष अंबिलवादे,शामसुंदर धूत, कृष्णा ठोंबरे, रावसाहेब तोगे, संदीप साबणे, बाबासाहेब लगड, मोहसीन चाऊस, राहुल वानखेडे, सुधीर माने, सोपान देशमुख, कावेरी पाहुणे पाटील तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती.


या प्रसंगी प्राचार्या डॉ. सी.एस. पाटील यांनी नॅक मूल्यांकनात महाविद्यालयाने भरीव अशी कामगिरी केली त्याबाबतचे विवेचन आपल्या मनोगतात केले. या महाविद्यालयात भौतिक सोयी सुविधा, विद्यार्थ्यांचे प्रश्न, तसेच विद्यार्थ्यांना विविध स्तरावर रोजगार उपलब्ध करुन देऊन विद्यार्थ्यांचे स्वावलंबणाकडे लक्ष वेधले आहे. माजी विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थी यांच्या सोबत यशस्वी बैठक नॅक समिती सोबत झाली. चौथ्या आवर्तनाला सामोरे जातांना बदललेल्या नॅक अहवाल तयार करतांना अनेक क्रायटेरिया एकत्र करून याचे नवीन फॉरमॅट नुसार काम केले. या नवीन फॉरमट मध्ये नॅक हे महाविद्यालयासमोर आव्हानात्मक काम होते. नॅक समितीने महाविद्यालयातील बेसिक सुविधा, अभ्यासक्रमाचे निकाल आणि महाविद्यालयामधील कार्यालयीन, ग्रंथालयीन आणि सर्व विभागांची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महाविद्यालयाच्या पातळीवर घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमाची, विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी वेळोवेळी होणारे अभ्यासक्रमातील बदल व त्याचे होणारे फायदे याचे सुद्धा अवलोकन केले. श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर हे ग्रामीण भागातील एकमेव अनुदानित महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात अनेक खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने नेहमीच अकॅडमिक आणि सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून ठरलेल्या विजन आणि मिशन प्रमाणे काम करत आहे. म्हणून आजचा जो अ++ दर्जा महाविद्यालयास मिळाला आहे तो महाविद्यालयाला किंवा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच नव्हे तर संपुर्ण गंगापूर तालुक्यासाठी मोलाचा ठरला आहे. नॅक समितीने महाविद्यालयातील सर्व विभागांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यामधील भौतिक सुविधा व इतर सोयी सुविधांची पाहणी केली तसेच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधला व आपला अहवाल दिला. आणि त्या अहवालातून महाविद्यालयास अ++ दर्जा प्राप्त झाला आहे. या ग्रेडचा इथून पुढील वाटचालीस खूप फायदा होईल याचा विश्वास वाटतो. याचे सर्व मुक्तानंद परिवाराला मनस्वी समाधान आहे. असे मत व्यक्त केले.

आपल्या अध्यक्षीय समारोपात बोलतांना आमदार सतीशभाऊ चव्हाण म्हणाले की, श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर या आमच्या संस्थेच्या महाविद्यालयाने महाराष्ट्रात ग्रामीण भागात नॅक मूल्यांकनात प्रथम येण्याचा मान मिळविल्याबद्दल मला मनस्वी खूप आनंद व अभिमान आहे. १९७० साली स्व.बाळासाहेब पवार यांच्या प्रयत्नाने या महाविद्यालयाची स्थापना झालेली आहे. या महाविद्यालयास स्व.आ.यमाजीराव सातपुते यांचे ही मोठे योगदान लाभलेले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे याच हेतुने स्व.विनायकराव पाटील व त्यांच्या सहकार्यांनी या संस्थेची स्थापना केली होती. व हाच वारसा पुढे घेऊन जात आम्ही सर्व मंडळी वाटचाल करीत आहोत. महाराष्ट्रात विविध समिती अंतर्गत दौरा करतांना एक गोष्ट प्रकार्षाने जाणवते ती म्हणजे मुलींच्या शिक्षणाची. ग्रामीण भागात मुलींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण कमी आहे तसेच शिक्षण अपूर्ण सोडण्याचे प्रमाण खूप आहे. याची कारण मिमांसा करुन त्यावर संस्थेमार्फत लवकरच योग्य ते उपाय योजना करण्याचा मानस व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेऊन त्याची उन्नती व्हायला हवी हीच संस्थेची अपेक्षा आहे. नवीन महाविद्यालय समितीच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने अशीच प्रगती करावी अशी अपेक्षा व्यक्त करुन महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर येथे 02 व 03 डिसेंबर 2023 रोजी 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. तसेच महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम लवकरच सुरु होईल असे प्रतिपादन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्या डॉ.वैशाली बागुल, उपप्राचार्य डॉ.बी.टी.पवार, उपप्राचार्य प्रा.विशाल साबणे, पर्यवेक्षक डॉ.हरीराम सातपुते, प्रबंधक भास्कर सुरवसे यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सी.एस.पाटील, नॅक समन्वयक डॉ.विवेकानंद जाधव यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ.अजय देशमुख यांनी तर आभार प्रा.डॉ.संदीप गायकवाड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!