महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना मधे तालुक्यातील पन्नास जनांचा प्रवेश..

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना मधे तालुक्यातील पन्नास जनांचा प्रवेश..


गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील पन्नास जनांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना मधे प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न
गंगापूर शहरात २७ सप्टेंबर रोजी हिंदू जननायक राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होऊन महाराष्ट्र राज्य संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस योगेश परुळेकर, साधन-सुविधा व आस्थापना बाबासाहेब अवघडे व राज्य उपाध्यक्ष सतनामसिंघ गुलाटी यांच्या आदेशाने व जिल्हा संघटक अशोक पवार पाटील यांच्या नेतृत्वात गंगापूर शहर व तालुक्यातील पन्नास जनांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना मधे रितसर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याचे आयोजन अशोक कराळे पाटील उपजिल्हा संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना छत्रपती संभाजीनगर यांनी केले. या कार्यक्रमास मनविसे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मनोज पुंडेकर, शहर अध्यक्ष योगेश मुरकुटे ,ता. अध्यक्ष संतोष लाड, तुळशीराम ठोंबरे, संदीप लगड, दत्तू थोरात, विजय उमाप ,शुभम ठोंबरे, बाळासाहेब बोजवारे संतोष धनायत, संजय कर्डिले, विश्वजीत पाटील, दादा धनायत, बाळासाहेब मोघे, दत्तात्रय काळे, भाऊसाहेब गायकवाड, काजी, विजय बोजवारे ,फैसल मणियार, आकाश बोजवारे ,अक्षय धनायत, आकाश आगळे, वाल्मीक दाभाडे, रोहिदास थोरात ,प्रमोद नाडे, सौरभ खरे ,आकाश खरे ,राहुल राठोड, सार्थक गावंडे ,सचिन मावस, निलेश पवार आदी पदाधिका-यांची उपस्थिती होती तसेच गंगापूर येथील प्रसिध्द भजनी मंडळ यांनीही रितसर प्रवेश केला. या नंतर गंगापूर तालुक्याची कार्यकारीणीची सर्वानुमते निवड करुन नारळ फोडून फटाक्याची आतीषबाजी करून मिठाई वाटप करण्यात आली व पहिली कार्यकारीणीचा मान गंगापूर तालुक्याने मिळविला. आता लवकरच गंगापूर येथे दसरा व दीपावलीच्या मधे रस्ते, साधन – सुविधा व आस्थापना तर्फे मोठया प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल असे अशोक पवार व अशोक कराळे यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!