बसस्थानक येथील महिला स्वछतागृह व्यवस्थित करा नसता तीव्र आंदोलन छेडणार- कावेरी पाहुणे

बसस्थानक येथील महिला स्वछतागृह व्यवस्थित करा नसता तीव्र आंदोलन छेडणार- कावेरी पाहुणे
गंगापूर (प्रतिनिधी) आठ दिवसाच्या आत बसस्थानक येथील महिला स्वछतागृह व्यवस्थित करा नसता तीव्र आंदोलन करणार -कावेरी पाहुणे
राज्य परिवहन महामंडळ, गंगापूरचे आगारव्यवस्थापक यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की
गंगापूर बसस्थानकात माहिला व विद्यार्थिनी प्रवाशांची संख्या खूप जास्त आहे.परंतु बसस्थानक आगारामधील स्वछतागृह असुन अडचण नसून खोळंबा अशी झाली सध्या त्याची परिस्थिती अत्यंत दैनिय झालेली आहे, स्वच्छतागृहात काहीही पाणी, नळ, लाइट, साफसफाई स्वछता या पैकी एक ही सुविधा नाही. त्यामुळे प्रवासी माहिला व विद्यार्थिनींना उघड्यावर स्वछतेसाठी जावे लागतेया स्वच्छता गृहाची आठ दिवसाच्या आत स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर सुधारणा करावी. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी माहिला काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनावर राष्ट्रवादीचे महीला शहराध्यक्षा कावेरी गजानन पाहुणे पाटील यांची स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!