गंगापूरच्या तरुणीवर फेसबुक मित्राने बलात्कार करून गर्भपात केला छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल.


गंगापूर (प्रतिनिधी) फेसबुकवरून ओळख झालेल्या गंगापूर येथील तरुणीवर अत्याचार करणाऱ्या बीडच्या युवकावर गर्भपात व बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०२२ मध्ये प्रविण वसंत जवणे(३३) रा. देविनिमगांव ता. आष्टी जि. बीड याने गंगापूरच्या तरुणी सोबत फेसबुक वरुन ओळख निर्माण करुन छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठात भेट घेऊन चहामध्ये गुंगीचे औषध दिल्याने तरूणीला चक्कर आल्यासारखे वाटल्याने मला माझ्या घरी जायचे आहे मला बसमध्ये बसवुन द्या. नंतर त्याने तरुणीला बसस्टँडला न नेता मध्यवर्ती बसस्टँडच्या समोर दुर्गामाता मंदीराच्या पाठीमागे असलेल्या लॉज मध्ये नेले. रुम मध्ये नेल्यावर तरुणी चक्कर येवुन बेशुद्ध पडली नंतर जाग आली तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. तेव्हा ती खुप रडले. प्रविण तु माझ्या सोबत शारिरीक संबंध का केले असे विचारले तेव्हा तो मला म्हणाला की, मी केलं आता तुला काय करायचे ते कर. नंतर तो मला म्हणाला की, मला तुझ्यासोबतच लग्न करायचे आहे. नंतर तरुणी घरी गेली प्रवीणचा फोन रिसीव्ह करणे बंद केले होते तरीही तो म्हणायचा की, मला तुला भेटायचे आहे. नाही भेटली तर मी लॉजवर तुझे फोटो काढलेले आहेत? ते मी व्हायरल करेन अशा धमक्या देऊन सेंट्रल बसस्टँडच्या जवळ असणारे हॉटेल मध्ये नेवुन इच्छेविरुद्ध वारंवार शारिरीक संबंध केले, तेव्हा त्याने फोटो काढून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून बसमध्ये पाठलाग करुन २०२३ मध्ये भेंडाळा फाटा येथील रॉयल पॅलेस येथे जबरदस्तीने बलात्कार केला त्याचेपासुन तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपाताच्या गोळया दिल्या. त्यामुळे रक्तस्त्राव होवुन तरुणीचा गर्भपात केला तरुणीच्या तक्रारीवरून प्रविण वसंत जवणे याचे विरुद्ध गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी गुन्हा दाखल करून घेत हा गुन्हा छत्रपती संभाजीनगर येथे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास क्रांतीचौक पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे हे करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!